नवी दिल्ली : एकिकडे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू मैदानात दमदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून देत असतानाच विराट कोहली मात्र सध्याच्या घडीला खेळापासून दूर आहे. काही काळ त्याने मैदानापासून दूर राहत आपल्या खासगी जीवनाला महत्त्वं दिलं आहे. असं असलं तरीही त्याचं मुलाखतींचं सत्र मात्र सुरुच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक क्रिकेटमध्ये प्रशंसनीय स्तरावर असणाऱ्या विराटने अगदी सुरुवातीपासूनच त्याचा खेळ आणखी उत्तम कसा करता येईल यावर भर दिला. सोबतच त्याने शारीरिक सुदृढतेलाही तितकंच महत्त्वं दिलं. असा हा विराट आता म्हणजे चक्क निवृत्तीनंतरच्या दिवसांसाठीचा बेत आखत आहे. 


कारकिर्दीच्या या टप्प्यापासूनच विराचने दूरदृष्टीठेवत काही विचार केले आहेत. ज्याचा अंदाज येतो तो म्हणजे हॉटेल व्यवसायातील त्याच्या सक्रियतेमुळे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत विराटने क्रिकेट खेळणं थाबंवल्यानंतर आपण नेमकं काय करणार आहोत याचा खुलासा केला. बालपणापासूनच विविध पदार्थ आवडीने खाणाऱ्या विराटने आपण खवैय्या असल्याचं स्पष्ट केलं. विविध चवींची आपल्याला जाण असल्याचं म्हणत त्याने याच विभागातीच आपला एक बेत सर्वांसमोर ठेवला. 


विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ



'मी जेवण बनवत नाही, पण विविध पदार्थांच्या चवीची मला जाण आहे. एखादा पदार्थ किती चांगल्या पद्धतीने बनवला गेला आहे, हे मला कळतं. त्यामुळे मी जेव्हा क्रिकेट खेळणं थांबवेन, तेव्हा मला असं वाटतं की मी नक्कीच पाककला वगैरे शिकेन',  असं विराट या मुलाखतीत म्हणाला. विराटचा हा बेत पाहता आणि मुळात तो एक खवैय्या असल्याची बाब लक्षात घेता, येत्या काही वर्षांमध्ये तो एक चांगला शेफ नक्कीच होऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही.