मॅच पाहायला गेलेल्या भारतीयांना दुबईच्या स्टेडियममध्ये अडवलं
भारताच्या दोन क्रिकेटप्रेमींना दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश करत असताना अडवण्यात आल्याची घटना घडली आहे.
दुबई : भारताच्या दोन क्रिकेटप्रेमींना दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश करत असताना अडवण्यात आल्याची घटना घडली आहे. हे दोन्ही क्रिकेटप्रेमी पाकिस्तान सुपर लीग(पीएसएल)ची मॅच पाहायला गेले होते. पण थोडावेळानंतर या दोघांना स्टेडियममध्ये पाठवण्यात आलं. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे ही भारतीय प्रेक्षकांना अडवल्याची बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली. अखेर या दोघांना मॅच बघण्याची परवानगी देण्यात आली.
याप्रकरणाचा आमच्याशी काहाही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्यानं दिली. संपूर्ण स्टेडियमच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिक पोलिसांची आहे. आम्हाला समजलं तेव्हा आम्ही चर्चा केली आणि मग त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला, कारण त्यांच्याकडे तिकीट होतं, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अधिकारी म्हणाला.
१४ फेब्रुवारीला जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. यानंतर २६ फेब्रुवारीला सकाळी भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले. याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं भारतीय सीमेत आली.