मुंबई : टीम इंडियात स्थान मिळवण्यापेक्षा ते टिकवणं फार आव्हानात्मक असतं. आतापर्यंत अनेक खेळाडू आले आणि गेले. संघातील स्थान कायम ठेवण्यासाठी धमाकेदार कामगिरी सातत्याने करणंही महत्त्वाचं असतं. पण एखादा खेळाडू येतो, चांगली कामगिरी करतो आणि अनुभवी खेळाडूंसमोर आव्हान उभं करतो. एका मुंबईकर खेळाडूने दुसऱ्या मुंबईकर खेळाडूसमोर आव्हान उभं केलंय. आपण बोलतोय ते श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणेबद्दल. (indian cricket team ajinkya rahane  out of form in test cricket)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रहाणे गेल्या काही काळापासून सातत्याने अपयशी ठरतोय. रहाणेला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. रहाणेसमोर आता मुंबईकर श्रेयस अय्यरने आव्हान उभं केलंय. त्यामुळे रहाणेला संघातील स्थान कायम ठेवण्यासाठी चांगली खेळी करण्याशिवाय पर्याय नाही. 


रहाणेची निराशाजनक कामगिरी


रहाणेची बॅट गेल्या काही काळापासून तळपली नाहीये. रहाणेने 2021 मध्ये आतापर्यंत एकूण 21 डावांमध्ये 19.57 च्या सरासरीने 411 धावा केल्या आहेत. यामध्ये फक्त 2 अर्धशतकांचा समावेश आहे. न्यूझीलंड विरुद्ध कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत रहाणेने अनुक्रमे 35 आणि 4 धावा केल्या होत्या. यानंतर रहाणेचा बॅटिंग एव्हरेज 40 पेक्षा खाली घसरला.


श्रेयस अय्यरचा पदार्पणात धमाका


श्रेयसने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून पदार्णप केलं. श्रेयसने पदार्पणातच धमाका केला. त्याने पहिल्याच डावात शतक तर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं. श्रेयसने त्याला मिळालेल्या पदार्पणाच्या संधीचं फायदा घेतला. त्याने पहिल्या डावात 105 आणि दुसऱ्या डावात 65 धावा केल्या. श्रेयसला खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कराने गौरवण्यात आलं. अय्यर गेल्या 3 वर्षांपासून वनडे आणि टी 20 टीमचा सदस्य आहे. श्रेयस टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करतो. 


आयपीएलमध्ये दमदार खेळी 


श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळतो. त्याने दिल्लीला अनेकदा सामने जिंकून दिले आहेत. अय्यरने आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 8 सामन्यात 175 धावा केल्या. तसेच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 54 सामन्यात 4 हजार 592 धावा केल्या आहेत. तसेच श्रेयस आयपीएलमध्ये कॅप्टन्सीही करतो. त्यामुळे आगामी काळात रहाणेसमोर अय्यरचं कडवं आव्हान असणार आहे.