मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मोठी घोषणा केली आहे. विराट आगामी टी 20 वर्ल्ड कपनंतर टी 20 क्रिकेटमधून कर्णधारपदावरुन पायऊतार होणार आहे. स्वत: विराटने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. मात्र विराट वनडे आणि कसोटीत कर्णधारपदी कायम असणार आहे. विराटने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात टी 20 क्रिकेटमध्ये सातत्याने अनेक सामने तसेच मालिका जिंकून दिल्या. विराटने आतापर्यंत त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला किती सामने जिंकून दिले आहेत, हे आपण या निमित्ताने जाणून घेणार आहोत.(indian cricket team captain Virat Kohli performance in T20 as captain see statistics)
  
कर्णधार विराटची टी 20तील विजयी आकडेवारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटने आतापर्यंत 45 टी 20 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलंय. विराटने आपल्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला 45 पैकी 29 मॅचमध्ये विजयी केलं. तर 29 सामन्यात प्रतिस्पर्धी संघाने अस्मान दाखवलं. वनडेप्रमाणेच टी 20 मध्येही 2 मॅचेसचा निर्णय लागला नाही.


विराटने सातत्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिलाय. मात्र विराटला  एकदाही आयसीसीच्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवून देता आलेलं नाही. त्यामुळे विराटवर या मुद्द्यावरुन अनेकदा टीकेची झोड उठवण्यात आली. त्यामुळे कुठेतरी विराटवर कर्णधारपद सोडण्याचं दडपण होतं. काही दिवसांपूर्वी विराट कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता विराटच्या घोषणेमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 


पुढचा कर्णधार कोण? 


विराट टी 20 वर्ल्ड कपनंतर कॅपटन्सी सोडतोय. त्यामुळे आता पुढचा कर्णधार कोण असणार, याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा रंगू लागली आहे. विराटनंतर रोहित शर्माचं कॅपटन्सीसाठी नाव आघाडीवर आहे. रोहितलाच कॅप्टन करावं, अशी क्रिकेट चाहत्यांची मागणी आहे. रोहितने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आपल्या कॅप्टन्सीत 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलंय. त्यामुळे रोहितच प्रबळ दावेदार मानला जातोय.  


रोहितचे आयपीएलमधील आकडे


रोहितने आयपीएलमध्ये 132 सामन्यात टीमला लीड केलंय. या 123 पैकी 74 सामन्यात रोहितच्या संघाने विजय मिळवला. तर 49 मॅचेसमध्ये पराभव झाला.  आयपीएलमध्ये विराटच्या तुलनेत रोहितने कर्णधार म्हणून 9 सामने कमी खेळले आहेत. मात्र तरीही रोहितने कर्णधार म्हणून विराटपेक्षा अधिक सामने जिंकून दिले आहेत.


उल्लेखनीय बाब म्हणजे रोहितने मुंबईला तब्बल 5 वेळा आयपीएलंच विजेतेपद मिळवून दिलंय. त्यामुळे विराटनंतर रोहितंच टी 20 आणि वनडे कॅप्टनपदाचा प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या टी 20 मधील नेतृत्वाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.