मुंबई: क्रिकेटपटू के एल राहुलने व्हिडिओ शेअर केल्यावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दाढीचा विमा उतरवल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. दरम्यान, ही चर्चा पाहून विराट कोहलीनेही मग आपल्य खास स्टाईलमध्ये या चर्चेला उत्तर दिले. विराटने युजवेंद्र चहल, उमेश आणि लोकेश राहुल यांना टॅग करत म्हटले आहे की, 'माझ्या दाढीवरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे. जी फारच मजेशीर आहे. पॉपकॉर्न टाइम आ गया है दोस्तों', असे म्हणत त्याने मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलच्या ११व्या पर्वादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत, 'आपल्याला दाढी फारच सुंदर दिसते. म्हणून ती आपण काढणार नाही', असे विराट कोहलीने म्हटले होते.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटपटू के एल राहुलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडित दिसते की, सोफ्यावर बसलेल्या विराट कोहलीचा दोन व्यक्ती फोटो काढत आहेत. तसेच, त्यातील एका व्यक्तिने विराटच्या दाढीचा एक केस कापून प्लॅस्टिकच्या हवाबंद बॅगमध्ये ठेवल्याचे दिसते. व्हिडिओ पाहता हा व्हडिओ एक सीसीटीव्ही फुटेज असल्याचे दिसते. दरम्यान, हा व्हिडिओच के एल राहुलने ट्विटरवर शेअर केला असून, त्याखाली एक संदेशही लिहीला आहे. या संदेशात‘मला माहित होतं तुझं तुझ्या दाढीवर प्रचंड प्रेम आहे, पण आता तिचा विमा काढून तू माझी थिअरी खरी ठरवली आहेस’, असे राहुलने म्हटले आहे.



के एल राहुलने शेअर केलेला कोहलीचा व्हिडिओ सोशल मीडियात भलताच व्हायरल झाला.