नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघात 'स्टार ओपनर' म्हणून ओळखला जाणारा आणि संयमी खेळीमुळं क्रीडारसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या रोहित शर्मा यानं अनेक विक्रम त्याच्या नावे केले आहेत. 'हिटमॅन' या नावाने जागतिक स्तरावर ख्याती प्राप्त असणाऱ्या रोहित शर्मा यानं त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. फक्त क्रीडा जगतातच नव्हे तर जाहिरात विश्वातही त्याची झलक पाहायला मिळाली आहे. असा हा खेळाडू मुंबईत एका आलिशान घरात राहतो. याव्यतिरिक्त लोणावळ्यातही त्याचा एल व्हिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार 6329 चौरस फुटांच्या भूखंडावर पसरलेल्या या व्हिलानं कायमच अनेकांचं लक्षही वेधलं आहे. पण, आता हाच व्हिला रोहितलं विकला आहे. Squarefeatindia.com नुसार 5.25 कोटी किंमत असणारा व्हिला रोहितनं सुषमा अशोक सराफ नावाच्या महिलेला विकला आहे. रोहितच्या व्हिलाचा व्यवहार सध्या मालमत्ता आणि भूखंड क्षेत्रामध्ये बराच चर्चेत आहे. 


IND VS ENG: इंग्लंड मालिकेतून बुमराहचा पत्ता कट? संघात विराटच्या खास व्यक्तीची एन्ट्री


 


सध्या कुटुंबासमवेतही वेळ व्यतीत करतोय रोहित 


वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर रोहित त्याच्या कुटुंबासमवेत इंग्लंडमध्ये खास वेळ व्यतीत करत आहे. यावेळी पत्नी आणि मुलगीही  त्याच्यासोबत आहे. सोशल मीडियावर रोहित आणि त्याच्या कुटुंबाचे काही गोड फोटो सध्या सर्वांच्या मनाचा ठाव घेत आहेत. 


4 ऑगस्टपासून भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या संघाविरोधात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात करणार आहे. यापूर्वी संघातील खेळाडूंना बायो बबलमधून जवळपास 20 दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळं हा वेळ खेळाडू त्यांच्या खास व्यक्तींसोबत व्यतीत करताना दिसत आहेत.