मुंबई : आयपीएल 2020 IPL 2020  मध्ये यंदाच्या हंगामात chennai चेन्नईच्या संघाची एकंदर कामगिरी क्रीडारसिकांना नाराज करणारी. त्यात नुकत्याच झालेल्या चेन्नई विरुद्ध rajasthan राजस्थानच्या सामन्यातही हेच चित्र पाहायला मिळालं. राजस्थानच्या संघातील गोलंदाजांच्या माऱ्यापुढं चेन्नईच्या संघाला फक्क १२५ धावाच करता आल्या. ज्यानंतर संघाची सुमार कामगिरी पाहता अनेक खेळाडूंवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला. यामध्ये सर्वाधिक टीकेचा धनी झाला तो म्हणजे केदार जाधव. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईच्या फलंदाजांनी या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. यामध्ये केदार जाधवला पुन्हा संधी देण्यात आलेली असतानाही तो प्रभावी खेळ दाखवू शकला नाही. ज्यामुळं त्याला ट्रोलिंगचा शिकार व्हावं लागलं. 


चेन्नईच्या संघाला ज्यावेळी चांगल्या आणि वेगवान धावसंख्येची गरज होती, पण केदारला मात्र काही कमाल करता आली नाही. त्यामुळं विजयाची अपेक्षा करणाऱ्या क्रीडारसिकांचा हिरमोड झाला आणि #KedarJadhav अशा ट्रेंडसह त्याला उद्देशून मीम्स पोस्ट करत नेकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 






 


आतापर्यंत चेन्नईच्या संघानं आयपीएलमध्ये प्रत्येक वेळी प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. तीन वेळा या संघानं जेतेपद तर, सहा वेळा उपविजेतेपद पटकावलं आहे. पण, यंदा मात्र संघाला सुरुवातीपासूनच सूर गवसताना दिसत नाही आहे.