गंभीर प्रकरण! भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांना अटक; क्रीडाविश्वाला हादरा
भारतीय क्रिकेट जगताला हादरा देणारी बातमी नुकतीच समोर आली आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट जगताला हादरा देणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. जिथं माजी क्रिकेटपटू, फलंदाजाचं कुटुंब अडचणीत आलं आहे. कारण, या खेळाडूच्या वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
हा खेळाडू आहे, नमन ओझा. नमनचे वडील विनय ओझा यांच्यावर सव्वा कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असल्यामुळं सोमवारी सायंकाळी मध्य प्रदेशमधील बैतूल येथील मुलताईमधून त्यांना ताब्यात घेतलं गेलं.
जौलखेड़ामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत सेवेत होते. दरम्यान, त्यांच्यावर बऱ्याच कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण, बऱ्याच दिवसांपासून ते फकाक होते. अखेर पोलिसांनी ओझा यांना बैतूलमधून ताब्यात घेतलं. (indian cricketer naman ojha father arrested in fraud case)
नेमकं प्रकरण काय?
सूत्रांच्या माहितीनुसार 2013 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत बँक व्यवस्थापकपदी असणाऱ्या अभिषेक रत्नम, विनय ओझा यांच्यासह इतरांनी मिळून बनावट नाव आणि फोटोंच्या आधारे किसान क्रेडिट कार्ड बनवले होते.
बनावट कार्डाच्या आधारे त्यांनी बँकेकडून मोठी रक्कम घेतली होती. एका खातेधारकाच्या मृत्यूनंतरही त्यांच्या नावे रक्कम घेतल्याची बाब समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांच्या नावे बनावट कार्ड तयार करत जवळपास सव्वा कोटी रुपयांवर डल्ला मारला.
ओझा आणि त्यांच्यासोबत या गुन्ह्यामध्ये त्यांना साथ देणाऱ्यांनी ही रक्कम वाटून घेतली. दरम्यान, सदर प्रकरण प्रकाशात येताच ओझा आणि इतर दोषींवर भारतीय दंडसंविधानाअंतर्गत कलम 409, 420, 467, 468, 471, 120 बी, 34 आणि इतर तत्सम गुन्हे नोंदवले गेले.
तिथे मुलगा क्रिकेट विश्वात नाम कमवत असताना इथे विनय ओझा मात्र चुकीची कामं करत होते, ही बाब संपूर्ण क्रीडाजगताला हादरा देत आहे.