Prithvi Shaw with Girlfriend: भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पुन्हा एकदा चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे पृथ्वी शॉ पहिल्यांदाच आपल्या प्रेयसीसह सर्वांसमोर आला आहे. पृथ्वी शॉने आपली प्रेयसी निधी तपाडियासह (Nidhi Tapadia) IIFA पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी दोघांनी फोटोग्राफर्ससमोर पोझही दिली. या सोहळ्यासाठी पृथ्वी शॉ एकदम स्टायलिश कपड्यांमध्ये पोहोचला होता. पृथ्वी शॉने स्लीव्हलेस जॅकेट, काळा शर्ट, काळी जिन्स आणि काळी टोपी घातली होती. तर मॉडेल आणि अभिनेत्री निधीने काळी साडी नेसत मॅचिंग केलं होतं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीलमध्ये पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्स संघात होता. पण तो अपेक्षित खेळी करु शकत नसल्याने संघाने त्याला प्लेइंग XI मधून डिच्चू दिला होता. यानंतर पंजाब किंग्सविरोधातील सामन्यात त्याला पुन्हा संधी देण्यात आली होती. यानंतर मुंबईच्या या क्रिकेटरने अर्धशकत झळकावलं होतं. पण याव्यतिरिक्त दिल्ली संघासाठी पृथ्वी शॉ फार मोठं योगदान देऊ शकला नाही. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 


आयपीएलमधील 8 सामन्यात पृथ्वी शॉने फक्त 106 धावा केल्या. दिल्ली संघासाठी ही मोठी चिंतेची बाब असून, पुढील आयपीएल हंगामात याचा फरक पडू शकतो. भारतीय टी-20 संघातही पृथ्वी शॉला संधी देण्यात आली होती. पण त्यावेळीही तो आपली छाप पाडण्यात अयशस्वी ठरला. त्यामुळे वेस्ट इंडिजविरोधातील आगामी टी-20 मालिकेतून पृथ्वी शॉला वगळल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. पृथ्वी शॉच्या जागी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या यशस्वी जैस्वालला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, पृथ्वी शॉ मैदानाबाहेरील वादांमुळेही गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपनी गिल हिच्यासोबत झालेल्या वादानंतर पृथ्वी शॉने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. 


सोशल मीडियावर पृथ्वी शॉचा सपना गिलसोबतच्या बाचाबाचीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सेल्फी घेण्यावरून झालेला हा वाद थेट कोर्टात पोहोचला होता. पृथ्वी शॉने पोलीस ठाण्यात तक्रा केल्यानंतर सपना गिलला तुरुंगात जावं लागलं होते. कोर्टाने नंतर तिला जामीन मंजूर केला होता. जामीन मिळाल्यानंतर सपनाने गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यानंतर हायकोर्टाने पृथ्वी शॉसह 11 जणांना नोटीस पाठवली होती. सपनाने यादरम्यान पृथ्वी शॉवर गंभीर आरोप केले होते. 


दुसरीकडे या वादानंतर रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पृथ्वीने चांगलं कमबॅक केलं होतं. त्याने रणजीत 6 सामन्यात 595 धावा केल्या होत्या. तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने 10  सामन्यात 332 धावा ठोकल्या.