`जर माझी गरजच नसेल तर...`, आर अश्विनचं निवृत्तीआधी रोहित शर्मासह झालेलं संभाषण उघड
भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती जाहीर केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सुरु असून तिसऱ्या कसोटीदरम्यान त्याने ही घोषणा केली.
भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती जाहीर केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सुरु असून तिसऱ्या कसोटीनंतर त्याने ही घोषणा केली. सामन्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आर अश्विनने रोहित शर्माच्या उपस्थितीत निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्माने देशाला मिळालेला मॅच विनर खेळाडू निवृत्त होत असल्याने आपण निशब्द झाल्याचं म्हटलं आहे.
"अॅशबद्दल बोलायचं गेल्यास तो आपल्या निर्णयाबाबत फार ठाम होता. मला पर्थला आल्यानंतर याबद्दल समजलं. मी पहिले तीन ते चार दिवस नव्हतो. पण तेव्हापासून त्याने ठरवलं होतं. यामागे अनेक गोष्टी घडल्या आहेत. मला खात्री आहे की जेव्हा तो त्या स्थितीत जाईल तेव्हा याचं उत्तर देऊ शकेल," असं रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितलं.
"संघ नेमका काय विचार करतो हे त्याला समजतं. आपण कोणत्या कॉम्बिनेशनबद्दल विचार करत आहोत हेदेखील त्याला समजतं. आम्ही इथे आलो तेव्हा कोणता स्पिनर खेळणार याबद्दल स्पष्ट नव्हतो. आम्हाला फक्त आमच्यासमोर कोणती स्थिती आहे हे समजून घ्यायचं होतं. जेव्हा मी पर्थमध्ये पोहोचलो तेव्हा आमच्यात याबद्दल बोलणं झालं. मी त्याला कशाप्रकारे गुलाबी चेंडू मालिका खेळण्यासाठी थांबावं म्हणून तयार केलं," अशी माहिती रोहितने दिली.
"हे असं घडले की त्याला कुठेतरी वाटलं असेल की, 'माझी मालिकेत आता गरज नसली तर मी निरोप घ्यायला गवा. खेळाला अलविदा म्हणतो. परंतु आम्ही अद्याप मेलबर्नला गेलेलो नाही. आम्हाला तिथे कोणत्या प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे आणि कोणतं कॉम्बिनेशल चालेल याबद्दल माहिती नाही. परंतु फक्त आर अश्विनचा विचार केला असता त्याला आणि त्याच्या निर्णयाचा आदर करायला हवा. जर तो तसा विचार करत असेल तर आपण त्याला तसा विचार करण्याची मुभा द्यायला हवी," असं रोहित शर्माने सांगितलं.
38 वर्षीय खेळाडूने 106 सामन्यांमध्ये 537 विकेट्ससह कसोटीत भारतासाठी दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून निवृत्ती घेतली, एकूण आकडेवारीत तो अनिल कुंबळे (619 विकेट) यांच्या मागे आहे. मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये, 2011 विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघांचा तो भाग होता.
"तो आमच्यासाठी एक मोठा मॅच-विनर आहे. त्याला स्वतःहून ते निर्णय घेण्याची मुभा आहे, आणि आता असेल तर तसे असू द्या. तुम्ही त्याच्या पत्रकार परिषदेत पाहिल्याप्रमाणे तो एक अतिशय विनोदी पात्र दिसतो. तो खूप मजेदार माणूस, यात काही शंका नाही", असंही रोहित म्हणाला
"मी अंडर 17 पासून ॲशसोबत क्रिकेट खेळलो आहे. तेव्हा तो एक सलामीवीर फलंदाज होता, आणि नंतर काही वर्षांनंतर, आम्ही सर्व गायब झालो आणि मग अचानक मला तामिळनाडूच्या आर अश्विनने पाच विकेट, सात विकेट घेतल्याचं ऐकू आलं. मला आश्चर्य वाटलं की मी तर त्याला फलंदाज म्हणून पाहिलं आहे आणि मग अचानक तो एक गोलंदाज बनला जो विकेट्स घेतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आम्ही पुन्हा भेटलो आणि मग आम्ही एकत्र दीर्घ प्रवास केला, ”असं तो पुढे म्हणाला.