Rishabh Pant Accident: भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत एका वर्षाहून अधिक काळ संघाबाहेर आहे. गेल्या वर्षी दिल्ली रुरकी हायवेवर झालेल्या भीषण अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याचे कुटुंबीय, चाहते, घरची मंडळी तसेच भारतीय टीममधील त्याच्या मित्रांनाही मोठा धक्का बसला होता. रिषभ आता हळुहळू रिकव्हर होत आहे. दरम्यान आयपीएलमधील ऋषभ पंतच्या संघाचा सदस्य असलेल्या अक्षर पटेलची एक प्रतिक्रिया समोर आली आहे. यामध्ये तो रिषभच्या रस्ते अपघाताबाबतची माहिती देत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत दिल्ली रुरकी हायवेवर झालेल्या भीषण अपघातात पंत जखमी झाला होता. स्थानिक लोकांच्या मदतीने पंतला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. अशा परिस्थितीत पंत आता आयपीएल 2024 मध्ये पुनरागमन करू शकतो, असे म्हटले जात आहे. ऋषभ पंतच्या आयपीएल संघाचा सदस्य असलेल्या अक्षर पटेलने पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलाय. 


दिल्ली कॅपिटल्सने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये पंतचा अपघात आणि बरे होण्याबाबतचे अपडेट्स शेअर केले आहेत. अक्षरने सांगितले की, सकाळी 7 किंवा 8 वाजता माझा फोन वाजला. प्रतिमा दीदीने फोन केला होता. प्रतिमा दीने मला विचारले, 'तू ऋषभशी शेवटचे कधी बोलला होता?' मी म्हणालो, 'नाही, मी उद्या करणार होतो, पण मी काल कॉल केला नाही. 'मला त्याच्या आईचा नंबर पाठव, त्याचा अपघात झाला आहे.' हे बोलण ऐकून अक्षर पटेलला मोठा धक्का बसला. 


पंत आयपीएल 2024 च्या लिलावात


सुरुवातीला मला वाटले की तो आता या जगात नाही. पंतने दिल्ली कॅपिटल्सच्या वतीने आयपीएल 2024 च्या लिलावात भाग घेतला होता. डीसीने हॅरी ब्रूक आणि ट्रिस्टन स्टब्स सारख्या खेळाडूंचा त्यांच्या फ्रँचायझीमध्ये समावेश केला आहे.


रिकव्हरीवर पंत काय म्हणाला?


आपल्या रस्ता अपघाताविषयी बोलताना पंत म्हणाला की, मी जिवंत आहे हे पाहून मी स्वतःला भाग्यवान समजतो. सुरुवातीला बरे होणे खूप वेदनादायी होते, पण आता खूप रिकव्हरी झाली आहे. आता मी कधी परत येईन याची वाट बघतोय, असे पंत म्हणाला.