मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू rohit sharma रोहित शर्मा याच्या फिटनेसबाबत मागील बऱ्याच काळापासून चर्चा केल्या जात होत्या. हॅमस्ट्रींग दुखापतीमुळं त्याला यंदाच्या आयपीएल 2020 मध्येही काही सामन्या्ंतून मुकावं लागलं होतं. किंबहुना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीची खेळाडूंची पहिली यादी जाहीर झाली त्यात त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला नव्हता. पण नंतर हा निर्णय़ बदलला गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता अशाही चर्चा सुरु आहेत की India vs Australia भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या या सामन्यांमध्ये रोहित कसोटी मालिकेला मुकणार आहे. 


मुंबईच्या संघाला आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर रोहितनं भारतीय क्रिकेट संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाणं टाळलं. त्याऐवजी तो भारतात परत आला आणि सध्या तो प्रशिक्षण घेत असून दुखापतीतून सावरत आहे. स्पोर्ट्स टुडेच्या वृत्तानुसार रोहित भारतात अतिशय महत्त्वाच्या कारणासाठी परतला होता. 


वडिलांना कोरोनाची लागण झाल्यामुळं त्यांच्या काळजीपोटी त्यानं मायदेशाची वाट धरली होती. तो मुंबईत परतण्यामागं हेच मुख्य कारण होतं. रोहित प्रवास टाळत त्याच्या कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करु शकत होता पण, त्यानं तसं केलं नाही. त्यामुळं त्याला रेड- बॉल सीरिज खेळायची नाही असं बोलण्याक काहीच तथ्य नाही, असं वक्तव्य एका प्रख्यात पत्रकारांनी केलं. 


 


पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियातील विलगीकरण अर्थात क्वारंटाईनचे quarantine नियम रोहित आणि इशांत शर्मा या दोन्ही खेळाडूंना test series कसोटी मालिकेत खेळण्याची अनुमती देत नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार हे खेळाडू ऑस्ट्रेलियाला गेले तरीही त्यांना 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार असून, प्रशिक्षणात सहभागी होता येणार नाही. पण, जर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानं सरकारशी चर्चा करत यावर तोडगा काढला तर त्यांना क्वारंटाईन काळात प्रशिक्षणाची परवानगी मिळू शकते. तेव्हा आता सर्वांच्याच नजरा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाकडे लागल्या आहेत.