दक्षिण आफ्रिका दौरा गाजवून परतला अन् हा खेळाडू चक्क मुंबई लोकलने घरी गेला!
बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्या या खेळाडूने चक्क लोकल रेल्वेने घरी जाणे पसंत केले.
मुंबई : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौरा गाजवला. वन-डे आणि टी-२० मध्ये चांगले यश मिळवले. त्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतला. दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौरा गाजवणारा टीम इंडियाचा हा खेळाडू मुंबईत विमानाने पोहोचला. बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्या या खेळाडूने चक्क लोकल रेल्वेने घरी जाणे पसंत केले.
थेट अंधेरी रेल्वे स्टेशन गाठले
मुंबईत उतरल्यानंतर थेट अंधेरी रेल्वे स्टेशन गाठले आणि तिकीट खिडकीवर जाऊन पहिल्या वर्गाचे तिकीट काढले. लोकलमध्ये पाऊल ठेवले आणि प्रवासी पुन्हा पुन्हा त्याला निरखून पाहू लागले. याला कुठेतरी पाहिलेय. पण लगेच लक्षात येईना. त्यामुळे काहींनी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून गूगलवर फोटो सर्च केला आणि या खेळाडूची ओळख पटली आणि प्रवासी चक्क त्याच्याशी संवाद साधू लागलेत.
विमानातून उतल्यानंतर लोकलने प्रवास
आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा क्रिकेटपटू सर्वसामान्यांप्रमाणे मुंबईत लोकलने प्रवास करत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. या खेळाडून आयपीएलमध्येही आपले नाव कमावले. हा खेळाडू तुम्हाला मुंबईच्या रेल्वेच्या डब्यातून प्रवास करताना दिसला, तर! धक्का बसेल ना. तसाच प्रकार घडला. फास्टर बॉलर शार्दुल ठाकूर याने मुंबईत उतल्यानंतर लोकलने प्रवास करुन आपले पाय जमिनीवर असल्याचे दाखवून दिले.
याआधी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळवणाऱ्या सचिन तेंडुलकर एकदा रिक्षाने विमानतळावर पोहोचला होता. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसचा प्रकार हा शार्दुल ठाकूरच्याबाबती घडला.
रेल्वे प्रवाशांनी साधला संवाद
शार्दुल मुंबईत क्रिकेट खेळण्यासाठी तो थेट पालघरहून रेल्वेने यायचा. त्यावेळी तू प्रवासात एवढा वेळ घालवतोस, तर तू कसा चांगला क्रिकेटपटू होशील? असे प्रश्न बऱ्याच जणांनी विचारले होते. पण या सर्व प्रश्नांना त्याने आपल्या कामगिरीतूनच उत्तर दिलेय. आता पुन्हा चांगली कामगिरी करुनही पुन्हा लोकलने प्रवास करुन त्याने आपणही सामान्य असल्याचे दाखवून दिले.