मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर आणि पत्नी अनुष्का शर्मा यांच्यात पडलेल्या वादाच्या ठिणगीत आता क्रिकेटपटू विराट कोहली याने उडी घेत काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या. सर्वत्र खोटं बोललं जात असतानाच ते अनेकांना खरं वाटू लागलं त्यावेळी मात्र नेमकं काय घडलं हे समोर येणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया विराट कोहलीने मांडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत कोहलीने इंजिनियर यांच्याकडून त्याच्या पत्नीविषयी सांगण्याच आलेल्या सर्व गोष्टी धुडकावून लावल्या. 'ती श्रीलंकेसोबतचा सामना पाहण्यासाठी आली होती. मुळात ती फॅमिली बॉक्समध्ये होती. फॅमिली बॉक्स आणि निवड समितीसाठीचा सिलेक्टर्स बॉक्स या दोन्ही वेगळ्या जागा आहेत. त्या ठिकाणी तेव्हा निवड समितीतून कोणीच नव्हतं', असं विराटने स्पष्ट केलं. 


अनुष्का तिच्या दोन मित्रांसमवेत फक्त एक सामना पाहण्यासाठी तेथे आली होती, असं स्पष्ट करत जेव्हा यशाच्या या टप्प्यावर असताना तिचं नाव चुकीच्या पद्धतीने घेतलं जातं तेव्हा त्याची दखल घेतली जातेच, असं म्हणत विराटने अनुष्काची बाजू ठामपणे मांडली. 


'अनुष्काचा स्वभाव, तिचं संगोपन या सगळ्याचा आधार पाहता नियमबाह्य वागणं हे तिला स्वत:ला पटत नाही. त्यामुळे मला हेच कळत नाही, की लोकं चुकीच्या पद्धतीन तिच्या नावाचा वापर करत तिच्यावर निशाणा का साधत आहेत, असा प्रश्व उपस्थित करत सुरुवातीचे काही दिवस आपण दोघांनीही हे सारंकाही दुर्लक्षित ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं विराटने मुलाखतीत सांगितलं. फारुख इंजिनियर यांच्या वक्तव्यावर निशाणा साधत विराटने याप्रकरणी आपली नाराजी व्यक्त केली. 



का पडली होती वादाची ठिणगी? 


'वर्ल्ड कपदरम्यान मी एका निवड समिती सदस्याला ओळखूही शकलो नव्हतो. भारतीय ब्लेझर घालणारा हा कोण, असं मी विचारलं तेव्हा हा निवड समिती सदस्य असल्याचं उत्तर मला मिळालं. तो व्यक्ती अनुष्का शर्माच्या बाजूला होता आणि तिला चहाचा कप देत होता,' असं फारुख इंजिनियर म्हणाले, त्यांच्या या वक्तव्यावरुनच अनुष्काचाही पारा चढला होता. ज्यानंतर तिने आपलं नाव चुकीच्या प्रकरणांमध्ये चुकीच्या पद्धतीने घेतलं जात असल्याचं पाहून फक्त इंजिनियर यांनाच नव्हे तर, असं करणाऱ्या सर्वांनाच धारेवर धरलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने या मुद्द्यावर संताप व्यक्त केला होता.