Virat Kohli चं नेमकं काय सुरु आहे? Instagram Story मुळे चर्चांना उधाण
Virat Kohli Instagram Story : सध्या आपल्या कुटुंबासह निवांत वेळ घालवणाऱ्या विराट कोहलीने Instagram ला शेअर केलेल्या एका स्टोरीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. कोहलीच्या या स्टोरीवरुन नेटकरी वेगवेगळे अंदाज लावत आहेत.
Virat Kolhi Instagram Story: भारतीय क्रिकेटर आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या क्रिकेटपासून (Cricket) दूर आहे. विराट कोहली सध्या आपल्या कुटुंबासह वेळ घालवत आहे. विराट आणि अनुष्का (Virat and Anushka) अनेक आश्रमांमध्ये जात असून तेथील फोटो सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आहे. तसंच काही मंदिरांमध्ये जाऊन ते दर्शन घेतानाही दिसत आहे. याशिवाय नुकतंच विराटने अनुष्कासह ट्रेकिंगला गेल्याचा फोटो शेअर केला होता. त्यातच आता विराटने Instagram ला शेअर केलेल्या एका स्टोरीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
विराट कोहलीने इन्स्टाग्राला स्टोरी शेअर केली असून त्यामध्ये "तुमच्या मनाला मार्ग माहिती असतो. त्याच मार्गावर धावा" (Your heart knows the way. Run in that direction) असं लिहिलं आहे. विराटने ही स्टोरी टाकल्यानंतर त्याचे चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहेत. विराटने सहजच हा कोट शेअर केला आहे की, त्याला काही वेगळं सांगायचं आहे अशा अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत.
विराट नुकतंच पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकासह ट्रेकला गेला होता. विराट आणि अनुष्काने सोशल मीडियावर ट्रेकचे अनेक फोटो शेअर केले होते. त्याआधी दोघेही वृंदावन येथील आश्रमता दोघे प्रार्थना करत असतानाचे फोटो समोर आले होते. वृंदावन दौऱ्याआधी विराट आणि अनुष्का नववर्षाच्या स्वागतासाठी दुबईत गेले होते.
कोहलीने गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली खेळी केली आहे. गेल्या काही आठवड्यात त्याने तीन शतकं ठोकली आहेत. यामधील एक शतक बांगलादेश आणि दोन शतकं श्रीलंकेविरोधातील आहेत. न्यूझीलंडविरोधातील एकदिवसीय मालिकेत मात्र विराट फक्त 55 धावाच करु शकला.