Indian Cricketers Birthday: टीम इंडियाचे 3 स्टार क्रिकेटर श्रेयश अय्यर, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा तिघांचाही वाढदिवस 6 डिसेंबर रोजी असतो. तिघेही आपापल्या खेळाने विरोधक टीममध्ये धडकी भरवतात. तिघांची खेळायची स्टाइल वेगळी आहे. तिघेही नेहमीच सोशल मीडियात चर्चेत असतात. 6 डिसेंबर हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खूप खास आहे. कारण या एका दिवशी अनेक स्टार क्रिकेटर्सचा जन्म झाला होता. यामध्ये प्रामुख्याने सध्या सक्रिय असलेले क्रिकेटर जसप्रित बुमराह, रविंद्र जडेजा आणि श्रेयश अय्यर यांच्या नावाचा समावेश आहे. तिघेही स्टार खेळाडून 6 डिसेंबरला आपला जन्मदिवस साजरा करतात. या तिघांनाही कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. तिघांनी क्रिकेटच्या मैदानात खूप नाव कमवलंय. तसेच संपत्तीदेखील कमावली आहे. पण या तिघांमध्ये सर्वात जास्त श्रीमंत कोण आहे? तिघांपैकी कोणाकडे जास्त पैसा आहे? जसप्रित, श्रेयश आणि रविंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संपत्तीविषयी जाणून घेऊया. 


60 कोटी संपत्तीचा मालक बुमराह 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बूम बूम बुमराह नावाने प्रसिद्ध असलेला जसप्रित बुमराह जगातील दिग्गज बॉलर्सच्या यादीत गणला जातो. त्याचा जन्म 6 डिसेंबर 1993 ला अहमदाबाद येथे झाला. त्याच्या धारदार बॉलिंगचा सामना करणे हे जागतिक क्रिकेटमधील बॅट्समन्सना आव्हान वाटते. आपल्या बहारदार कामगिरीमुळे त्याने स्वत:ला टॉप बॉलर्सच्या लिस्टमध्ये नेऊन ठेवले आहे. कमाईच्या बाबतीतही बुमराह खूप पुढे आहे. बीसीसीआयचा वार्षिक करार, आयपीएल फीस, आंतरराष्ट्री मॅच फीस आणि ब्राण्ड एडोसमेंट हे त्याच्या कमाईचे माध्यम आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार जसप्रित बुमराहचे एकूण नटवर्थ साधारण 60 कोटी रुपये इतके आहे. मुंबई व्यतिरिक्त अहमदाबादमध्येदेखील त्याचे घर आहे. 


बुमराहपेक्षा दुप्पट श्रीमंत जडेजा 



बॉलिंग आणि बॅटिंग या दोघांमध्ये धमाल उडवून देणारा रविंद्र जडेजा भारतीय क्रिकेट इतिहासातील टॉप ऑलराऊंडर्समधील एक आहे. रविंद्र जडेजाचा जन्म 6 डिसेंबर 1988 ला गुजरातच्या जामनगर येथील नवागाममध्ये झाला होता. जडेजा आपल्या परिवारासह गुजरातच्या जामनगरमध्ये 'रॉयल नवघन' नावाच्या अलिशान बंगल्यात राहतो. ज्याची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. जामनगरमध्ये त्याची आणखी 3 घरं आहेत. याव्यतिरिक्त त्याच्याकडे सुंदर फार्महाऊसदेखील आहे. जडेजा आपल्या फार्महाऊसवर घोडेस्वारीचा आनंद घेताना दिसतो. रिपोर्ट्सनुसार रविंद्र जडेजाचे नेटवर्थ 120 कोटी रुपये इतके आहे. 


श्रेयश अय्यरकडे किती नेटवर्थ?



टीम इंडियाचा युवा आणि स्टायलिश क्रिकेटर श्रेयश अय्यरदेखील खूप श्रीमंत आहे. त्याचा जन्म 6 डिसेंबर 1994 रोजी मुंबईत झाला. नुकतेच आयपीएल 2025 च्या लिलावात पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएलच्या इतिहासातील तो दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. आयपीएल व्यतिरिक्त बीसीसीआय करार आणि जाहीरात हे त्याच्या कमाईचे साधन आहे. भारताच्या या स्टार खेळाडूकडे एकूण 80 कोटी संपत्ती आहे.