IND vs NZ World Cup 2023 : वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये 397 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर टीम इंडियाने (Indian Cricket Team) न्यूझीलंडला 70 धावांनी पराभूत करत दिमाखात वर्ल्ड कप फायनलमध्ये (World Cup Final) प्रवेश केला आहे. त्यामुळे आता येत्या रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दुसऱ्या सेमीफायनल विजेत्याशी टीम इंडिया दोन हात करेल. त्यामुळे आता फायनलची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ (Indian Dressing room Video) समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडियाने चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केलाय. 1983, 2003 आणि 2011 साली टीम इंडियाने फायनल गाठली होती. त्यातील दोनदा संघाला यश मिळालं होतं. त्यानंतर आता यंदा म्हणजेच 2023 मध्ये टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार का? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता सेमीफायनलमध्ये झालेल्या कडव्या सामन्यानंतर सर्वांनी जल्लोष केल्याचं पहायला मिळालं. वानखेडे स्टेडियमबाहेर दिवाळी साजरी झाली. मात्र, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील माहोल कसा होता? याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.


ड्रेसिंग रुममध्ये चहलची एन्ट्री


सेमीफायनल सामना पाहण्यासाठी यझुवेंद्र चहल याने मैदानात हजेरी लावली होती. त्याचबरोबर हार्दिक पांड्या देखील नारळपाणी पिताना दिसला होता. सामना संपवल्यानंतर युझीने थेट ड्रेसिंग रुममध्ये एन्ट्री केली अन् खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. थकलेले खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये आराम करताना दिसले. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांचे चेहरे थकलेले दिसत होते. कोच राहुल द्रविड यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्याचबरोबर सर्वांनी शमीचं कौतूक केलं. त्याचवेळी चहलने ड्रेसिंग रुममध्ये हजेरी लावली अन् विराट आणि इतर खेळाडूंची गळाभेट घेतली.


पाहा Video



दरम्यान, टीम इंडिया ज्यावेळी हॉटेलमध्ये जात होती, तेव्हा अनेकांनी टाळ्या वाजवत टीम इंडियाला निरोप दिला.  हॉटेलमध्ये देखील तुफान गर्दी दिसून आली. मुंबई का भाई कोण? रोहित रोहित अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या. त्यावेळी खेळाडू देखील फॅन्सच्या आनंदात सहभागी झाले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.