Rustam Sorabaji Cooper: भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. कारण भारताच्या दिग्गज माजी खेळाडून जगाचा निरोप घेतला आहे. सर्वोत्कृष्ट फर्स्ट क्लास क्रिकेटर रुसी कूपर नावाने ओळखले जाणारे रुस्तम सोराबजी कूपर यांचे निधन झाले आहे. त्यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुस्तम सोराबजी कूपर यांनी गेल्यावर्षी 14 डिसेंबर रोजी आपला 100वा जन्मदिवस साजरा केला होता. ते जगातील सर्वात जास्त काळ प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारे खेळाडू होते. त्यांच्या मृत्यूनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने ट्विट करून संवेदना व्यक्त केल्या आहेत.



क्रिकेट विश्वात दुःखाची लाट 


रुस्तम सोराबजी कूपर पारसी हे 1943-44 से 1944-45  मुंबईसाठी तर 1949-1951 मिडलसेक्ससाठी क्रिकेट खेळले. काउंटी क्रिकेट खेळणारे ते पहिले भारतीय होते. मिडलसेक्सचे ते सर्वात जुने आणि वयस्कर खेळाडू होते. ते देशाच्या स्वातंत्र्याआधी टुर्नामेंट खेळले होते.


रणजी ट्रॉफीत उडवली धम्माल 


1944-45 रणजी ट्रॉफी फायनल होळकर आणि बॉम्बे (आज मुंबई म्हणून ओळखले जाते) यांच्यात खेळली गेली. त्या सामन्यात रुस्तम सोराबजी कूपर यांनी सामन्यात चांगली कामगिरी केली होती. या सामन्याच्या पहिल्या डावात त्यांनी 52 तर दुसऱ्या डावात 104 धावा केल्या. या शानदार कामगिरीच्या जोरावर मुंबईने अंतिम सामना ३७४ धावांनी जिंकला. रणजी ट्रॉफीच्या या मोसमात त्यांनी 91.82 च्या सरासरीने 551 धावा केल्या ज्यात दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. हा त्यांचा शेवटचा रणजी हंगाम होता.


रुसी कूपर यांचा प्रथम श्रेणीतील विक्रम


रुस्तम सोराबजी कूपर यांनी 22 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 52.39 च्या सरासरीने 1205 धावा केल्या. यादरम्यान त्यांच्या बॅटमधून 3 शतके झळकली. रुस्तम सोराबजी कूपर यांनी इंग्लंडमधील हॉर्नसे क्लबकडूनही खेळला आणि तीन हंगामात 1000 हून अधिक धावा केल्या.