Sunil Chhetri Announces Wife's Pregnancy: भारतीय फुटबॉल टीमचा (Indian Football Team) कर्णधार आणि कॅप्टन फॅन्टास्टिक म्हणून ओळखला जाणारा सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने सर्वांना गुड न्यूज दिली आहे. इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेदरम्यान एक भन्नाट गोल मारत सुनील छेत्रीने सर्व चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. त्याचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसत आहे. त्यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवत सुनील छेत्रीचं अभिनंदन केलं.


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर भारत आणि वानुआतू (India vs Vanuatu) यांच्यात फुटबॉल सामना खेळवला जात होता. सामना रंगतदार होणार अशी पूर्ण शक्यता होती. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. दोन्ही संघ कडवी झुंज देत होते. सामना ड्रॉ होणार की काय? अशी शक्यता होती. त्याचवेळी टीम इंडियाचा कॅप्टन सुनील छेत्री याने आपल्या अनुभवाची ताकद दाखवली. 80 व्या मिनिटाला टीम इंडियाकडे नामी संधी साधून आली.


आणखी वाचा - Viral Video: इंग्लंडच्या रस्त्यावर 'कल हो ना हो', शाहरुखची सिग्नेचर स्टाईल पण हरभजन विसरला 'ती' गोष्ट; गीता म्हणते...


डाव्या बाजूच्या मिड फिल्डर शुभाशीष बोसकडे बॉल आला. त्यावेळी त्याने स्टाईकरच्या दिशेने फुटबॉल किक केला. त्याचवेळी बॉल छेत्रीच्या टप्प्यात आला आणि छेत्रीने संधी न गमवता गोल केला. स्टेडियमवर एकच जल्लोषाचं वातावरण होतं. त्यावेळी छेत्रीने फुटबॉल उचलला आणि टी-शर्टच्या आत लपवला. त्यावेळी त्याने हा गोल स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या आपल्या पत्नीस समप्रीत केला. त्यावेळी त्याने पत्नीच्या प्रेग्नेसीची गुड न्यूज दिली.


पाहा Video



दरम्यान, भारत आणि वानुआतू (India vs Vanuatu) यांच्यातील सामन्यात टीम इंडियाने 1-0 ने विजय मिळवला आहे. मी आणि माझी पत्नी आमच्या पहिल्या बाळाची वाट पाहतोय. माझ्या पत्नीला हे अशाप्रकारे या गोड बातमीची घोषणा करायची होती आणि मी तिची इच्छा पूर्ण केली, असं सुनील छेत्री म्हणाला आहे. फुटबॉलपटूमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांच्या यादीत सुनिल छेत्री तिसऱ्या स्थावावर आहे.