Indian National Anthem: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात डर्बन येथे पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला. कोणताही सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे राष्ट्रगीत वाजवले जाते. या सामन्यातही असेच घडले. प्रथम टीम इंडियाचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. भारताचे राष्ट्रगीत सुरू होताच अचानक असे काही घडले ज्याने खेळाडूंनाही आश्चर्याचा धक्का बसला. 


नक्की काय झाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमीप्रमाणे सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी उभे राहिले.सर्वप्रथम भारतीय टीमचे राष्ट्रगान सुरु झाले. परंतु काही सेकंदातच भारतीय राष्ट्रगीत सुरु असताना व्यत्यय आला आणि राष्ट्रगीत बंद पडले. यामुळे हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्यासह काही खेळाडू आश्चर्यचकित झाले. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांच्या चेहऱ्यावरही आश्चर्य दिसले. भारतीय राष्ट्रगीत एकदा नव्हे तर दोनदा खंडित करण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला असला तरी सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. एवढचं नाही तर मैदानात उपस्थित असलेले भारतीय चाहते यामुळे संतापलेले दिसले. 


हे ही वाचा: IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेवर भारताचा दणदणीत विजय, कर्णधार सूर्याने 'या' खेळाडूला दिला 'गेम चेंजर'चा टॅग


सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप 


झालेला घटना बघून सोशल मीडियावर चाहत्यांनी आपली निराशा व्यक्त केली. अनेकांनी या गोंधळाला अपमानास्पद म्हटले. काही लोकांनी  राष्ट्रगीत अचानक बंद करण्यावर प्रश्न उपस्थित केले. या घटनेचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


हे ही वाचा: Rishabh Pant: संस्कार! ऋषभ पंत आईचा आशीर्वाद घेऊन ऑस्ट्रेलियाला रवाना, एअरपोर्टवरील Video होतोय Viral


बघा हा व्हायरल व्हिडीओ 


 



 



दक्षिण आफ्रिका संघांची प्लेइंग-11 


रायन रिकेल्टन (विकेटकीपर ), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, एनकाबायोमजी पीटर


IPL Auction: महालिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर, जाणून घ्या तपशील


 


भारतीय संघांची प्लेइंग-11 


अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, आवेश खान.