IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेवर भारताचा दणदणीत विजय, कर्णधार सूर्याने 'या' खेळाडूला दिला 'गेम चेंजर'चा टॅग

India vs South Africa T20I: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 4 टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने दमदार सुरुवात केली. डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्याने 61 धावांनी शानदार विजय मिळवला. 

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 9, 2024, 12:27 PM IST
IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेवर भारताचा दणदणीत विजय, कर्णधार सूर्याने 'या' खेळाडूला दिला 'गेम चेंजर'चा टॅग  title=

India vs South Africa T20I, Sanju Samson: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत या 4 टी-20 सामन्यांच्या मालिकेची सुरुवात झाली आहे. यामध्ये भारताने दमदार सुरुवात केली आहे. डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 61 धावांनी शानदार विजय मिळवला. या वर्षी जूनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांमध्ये टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना झाला होता. तेव्हा भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव केला होता. हीच विजयी घोडदौड भारताने सुरू ठेवली आहे. भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना रविवारी, 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

सॅमसनने झळकावले झंझावाती शतक 

 दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत या सामन्यात सलामीवीर फलंदाज संजू सॅमसनने भारतासाठी धमाकेदार खेळी केली. त्याने 50 चेंडूत 107 धावांची खेळी खेळली. सॅमसनने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 10 षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 214 होता. 

टीम इंडियाचे एकत्रित प्रयत्न 

तिलक वर्माने 18 चेंडूत 33 तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 17 चेंडूत 21 धावा केल्या. एवढंच नाही तर भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना टिकू दिले नाही. टीम इंडियाकडून वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांनी ३-३ बळी घेतले. आवेश खानला 2 विकेट्सकचे यश मिळाले. अर्शदीप सिंगने एक विकेट आपल्या नावावर केली.

हे ही वाचा: Rishabh Pant: संस्कार! ऋषभ पंत आईचा आशीर्वाद घेऊन ऑस्ट्रेलियाला रवाना, एअरपोर्टवरील Video होतोय Viral

सूर्याने केले संजू सॅमसनचे कौतुक 

भारताच्या या विजयानंतर कर्णधार सूर्याकुमारने टीम इंडियाच्या खेळाडूंचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘‘गेल्या 3-4 मालिकेत आम्ही आमच्या क्रिकेटच्या शैलीत कोणताही बदल केलेला नाही. या विजयाने खूप आनंद झाला. सॅमसनने गेल्या काही वर्षांत केलेल्या कष्टाचे आणि कामाचे फळ त्याला मिळत आहे. तो त्याच्या शतकाच्या जवळ होता पण तरीही बाउंड्री शोधत होता. संघासाठी खेळणे हे त्याचे चरित्र दर्शवते आणि आम्हाला तेच हवे आहे." 

 

 

हे ही वाचा: ऋषभ पंतची मोठी झेप! ICC टेस्ट रॅंकींगमध्ये मिळाले सहावे स्थान, रोहित अन् विराटला 'जोर का झटका'

'मला कोणतेही ओझे उचलण्याची गरज नाही'

सूर्याने नंतर फिरकीपटूंबद्दल म्हणाला की, “हा मॅच प्लॅन होता. आम्ही क्लासेन आणि मिलरच्या महत्त्वाच्या विकेट्स शोधत होतो आणि फिरकीपटूंनी ज्या प्रकारे कामगिरी केली ती अविश्वसनीय होती."  यानंतर जेव्हा सूर्याला विचारण्यात आले की तो कर्णधारपदाचा आनंद घेत आहे का, तेव्हा तो म्हणाला, “मी नाणेफेक आणि पत्रकार परिषदेत आधीच सांगितल्याप्रमाणे, मुलांनी माझे काम सोपे केले आहे. मला कोणतेही ओझे उचलण्याची गरज नाही."