मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वाला हादरा देणारी एक बातमी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांच्या आनंदी वैवाहिक नात्याला आता तडा गेल्याचं म्हटलं जात आहे. एका सोशल मीडिया पोस्टमुळं ही धक्कादायक माहिती समोर आल्याचं कळत आहे. (indian opener Shikhar dhawan wife Divorce ayesha-mukherjee emotional post)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2012 मध्ये विवाहबंधनात अडकल्यानंतर मोस्ट हॅपनिंग सेलिब्रिटी जोड्यांच्या यादीत या जोडीला गणलं जात होतं. पण, आता मात्र नात्यांची समीकरणं पुरती बदलली आहेत असं चित्र आहे. सदर घटस्फोट प्रकरणावर शिखर धवनची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पण, आयेशानं लिहिलेली भावनिक पोस्ट मात्र यावरच जोर देत आहे. 


क्रिकेट जगतातील धक्कादायक बातमी, शिखर धवनचं पत्नी आयेशाबरोबरचं 9 वर्षांचं नातं संपुष्टात?


 


घटस्फोट हा शब्दही घाणेरडा... 
पहिल्यांदा घटस्फोट झाला, दुसऱ्या वेळी वाटतंय की खुप काही पणाला लागलं आहे. मला खुप काही सिद्ध करायचं होतं. त्यामुळं माझं लग्न दुसऱ्यांदा तुटलं हे फारच भयावह होतं. घटस्फोट हा शब्दही घाणेरडा होता, पण माझा दोनदा घटस्फोट झाला. एका शब्दाची इतकी ताकद मी घटस्फोटित असताना अनुभवली. पहिल्यांदा घटस्फोट झाला तेव्हा मी फारच घाबरलेले होते. मला वाटत होतं की मी अपयशी ठरले. मी त्यावेळी चुकीची होते. सर्वांची मान शरमेनं खाली घातली असं मला वाटत होतं. मी स्वार्थी होते अशी भावना मनात होती. आईवडिलांना मी निराश करतेय असं वाटत होतं. आपल्या मुलांना हिन वागणूक देतेय असं वाटलं. काही प्रमाणात मी देवाचाही अपमान केला असं वाटलं... खूपच वाईट शब्द होता घटस्फोट'.




आयेशानं लिहिलेल्या या पोस्टमधून घटस्फोट आणि त्यामुळं पुढे मिळणाऱ्या वेदनांना अधोरेखित करण्यात आलं आहे. एक घटस्फोटित म्हणून जगताना एका महिलेला कोणकोणत्या परिस्थितीतून जावं लागतं याचा खुलासा आयेशानं केला आहे. शिवाय यातून आपण नेमकं काय शिकलो हेसुद्धा तिनं लिहिलं आहे. मनात होणारी भावनांची कालवाकालव आणि त्यामुळं उठणारा विचारांचा काहूर आयेशाला नेमका कोणत्या टोकाशी आणून ठेवत आहे, असाच येश्न ही पोस्ट वाचताना उभा राहतो. 


आयेशाची ही पोस्ट सोशल मीडियावर कमालीची व्हायरल झाली आहे. त्यामुळं आता सर्वांचीच नजर शिखरच्या पोस्टकडे किंवा त्याच्या अधिकृत वक्तव्याकडे लागली आहे.