मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत खेळलेल्या अंतिम सामन्यांमध्ये सुरेश रैनाचा विक्रम उत्कृष्ट आहे. या हंगामात केकेआरविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नसली तरी, गेल्या 13 हंगामात या लीगच्या अंतिम सामन्यांमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. एवढेच नाही तर आतापर्यंत आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक षटकारांची नोंदही रैनाच्या नावावर आहे. सुरेश रैनाला या मोसमात बऱ्याच संधी देण्यात आल्या होत्या, पण त्याने प्रत्येक वेळी संघाला निराश केले आणि नंतर त्याच्याऐवजी रॉबिन उथप्पाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या फायनलमध्ये सुरेश रैनाने एकूण 249 धावा केल्या आहेत आणि तो पहिल्या क्रमांकावर आहे, तर शेन वॉटसन 236 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे, ज्याच्या नावावर 183 धावा आहेत, तर मुरली विजय 181 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. एमएस धोनी 180 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.


आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक रन करणारे खेळाडू


249 धावा - सुरेश रैना


236 धावा - शेन वॉटसन


183 धावा - रोहित शर्मा


181 धावा - मुरली विजय


180 धावा - एमएस धोनी


180 धावा - किरॉन पोलार्ड


रैनाने आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक षटकार मारले आहेत


सुरेश रैनाने आयपीएल फायनलमध्ये गेल्या 13 सीझनमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारले आहेत. त्याने आतापर्यंत एकूण 13 षटकार ठोकले असून तो पहिल्या स्थानावर आहे. शेन वॉटसन त्याच्यासोबत संयुक्तपणे 13 षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे. किरोन पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने एकूण 12 षटकार मारले आहेत, तर एमएस धोनी 11 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.



आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप 5 फलंदाज


13 षटकार - सुरेश रैना


13 षटकार - शेन वॉटसन


12 षटकार - किरॉन पोलार्ड


11 षटकार - एमएस धोनी


10 षटकार - युसूफ पठाण