मुंबई : २०१९ हे वर्ष क्रिकेटसाठी खास असणार आहे. कारण या वर्षी वर्ल्डकप रंगणार आहे. ३० मे ते १४ जुलै दरम्यान इंग्लंडमध्ये हा वर्ल्डकप रंगणार आहे. २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारतीय टीमने वर्ल्डकप जिंकला होता. आता भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या विराट कोहलीकडून अपेक्षा वाढल्या आहेत. सध्या भारतीय टीममध्ये संतुलन आणि फॉर्म दोन्ही आहे. अनेक भारतीय खेळाडू पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणार आहेत. त्यातच या वर्ल्डकपनंतर काही खेळाडूंच्या निवृत्तीची चर्चा रंगू लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. सुरेश रैना : सुरेश रैना सध्या भारतीय टीममधून बाहेर आहे. पण २०१९ च्या वर्ल्डकपमध्ये जर त्याला जागा मिळाली तर तो २०१९ चा वर्ल्डकप खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेऊ शकतो.
 
२. शिखर धवन : भारतीय टीमचा गब्बर शिखर धवनची कामगिरी सध्या इतकी चांगली नाही आहे. टेस्टमध्ये खराब कामगिरीमुळे त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्टमधून देखील बाहेर बसवण्यात आलं आहे. त्याच्या जागी महेंद्र अग्रवालला संधी देण्यात आली. पण वर्ल्डकप २०१९ नतंर धवन देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेऊ शकतो अशी चर्चा आहे.
 
३. रविचंद्रन अश्विन : भारतीय टीमचा स्पिनर रविचंद्रन अश्विन वर्ल्डकप २०१९ नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेईल अशी चर्चा आहे. कारण त्याची जागा आता टीममध्ये यूजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी घेतली आहे.


२. रोहित शर्मा : भारतीय टीमचा हिटमॅन रोहित शर्मा वर्ल्डकप २०१९ नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. युवा खेळाडू पृथ्वी शॉ सारखे खेळाडू आता टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.


१. महेंद्र सिंह धोनी : भारतीय टीमचा माजी कर्णधार धोनी वर्ल्डकप २०१९ नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेऊ शकतो. धोनीची सध्याची कामगिरी इतकी चांगली नाही. त्यामुळे त्याच्यावर टीका देखील होत असते. विकेटकीपर म्हणून ऋषभ पंतने देखील त्याची जागा घेतली आहे. त्यामुळे धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे.