Impact Player Rule : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच BCCI सध्या क्रिकेटमधील (Cricket) एक नियम बदलण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमामुळे क्रिकेटला एक वेगळं वळण दाट लागण्याची शक्यता वर्तवली जातेय. या नियमानुसार, सामन्यादरम्यान प्लेइंग XI मध्ये 11 ऐवजी 15 खेळाडू पात्र असतील. दोन्ही टीमच्या कर्णधारांना चार अतिरिक्त खेळाडू वापरता देखील येईल. (Indian Premier League New Rules 15 players will play in IPL latets marathi Sport News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BCCI या नियमांचा वापर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धत आणि IPLमध्ये करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे येत्या सिजनमध्ये आयपीएलची रंगत आणखी वाढणार आहे. कोणत्याही सामन्यात 11 ऐवजी 15 खेळाडू मैदानात उतरून सामना खेळण्यासाठी पात्र असणार आहे. 'इम्पॅक्ट प्लेयर' या नावाचा हा नियम असेल. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत 'इम्पॅक्ट प्लेयर' नियमाचा (Impact Player Rule) वापर केला गेला होता.


इम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार, सामन्यादरम्यान प्लेइंग 11 मधील खेळाडूच्या जागी कर्णधार दुसर्‍या खेळाडूचा संघात समावेश करू शकतो. बीसीसीआयने ऑक्टोबरमध्ये सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेदरम्यान या नियमाची चाचणी घेतली. राज्य संघांनी या निर्णयाचे स्वागत केले. या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल संचालन समितीने (GC) गुरुवारी संध्याकाळी या विषयावर चर्चा केली. इम्पॅक्ट प्लेअरबाबत फ्रँचायझीला आधीच माहिती देण्यात आली आहे.


नियमानुसार, इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा उपयोग दोन्ही टीमना फक्त एकदाच करता येणार आहे. टीमचा कर्णधार, टीमचे प्रशिक्षक किंवा टीम मॅनेजर यांना मैदानी किंवा फोर्थ अंपायरकडे इम्पॅक्ट प्लेयरची नावं सोपवावी लागतील. जो खेळाडू बाहेर होईल, त्याला उर्वरित चालू सामन्यात संधी दिली जाणार नाही. बीसीसीआय या नियमाबाबतील अधिकची घोषणा येत्या काही दिवसात करण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार 14 व्या ओव्हरआधी Impact Player सामन्यामध्ये वापरता येणार आहे.