ENG vs IND | इंग्लंड विरुद्ध वन डे, टी 20 सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा
ENG vs IND | इंग्लंड विरुद्ध सामन्यात कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट?
मुंबई : इंग्लंड विरुद्ध पाचवा कसोटी सामना 1 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा कोरोनामुळे खेळू शकणार नाही. त्यामुळे टीमचं नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे देण्यात आलं आहे. तर इंग्लंड विरुद्ध 3 टी 20 आणि 3 वन डे सामन्यांची सीरिज खेळवण्यात येणार आहे. यासाठी भारतीय टीम जाहीर करण्यात आली आहे.
इंग्लंड विरुद्ध टी 20 साठी निवड समितीने दोन टीमची निवड केली आहे. पाचव्या कसोटी सामन्यानंतर काही खेळाडूंना आराम देण्यात येणार आहे. त्यामुळे पहिला टी 20 सामना हे खेळाडू खेळू शकणार नाहीत. त्यामुळे पहिल्या टी 20 सामन्यासाठी वेगळी टीम असेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी वेगळी टीम असणार आहे.
पहिल्या टी 20 साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल , आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, उमरान मलिक
वन डे सामन्यासाठी इंग्लंड विरुद्ध भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह