Team India T20 World Cup: टी 20 वर्ल्डकप सुरु होण्यासाठी अवघ्या दोन दिवसांची अवधी उरला आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला असून भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 23 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघातील खेळाडूंचा फॉर्म बघितला तर यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेतील प्रबल दावेदार मानला जात आहे. दरम्यान दोन योग जुळून आल्याने क्रीडाप्रेमींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारताने आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दोनदा एकदिवसीय आणि एकदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. मात्र यावेळचं अंकशास्त्र भारतीय क्रीडाप्रेमींच्या आनंदात भर घालत आहे. विजयाबाबत 7 या अंकांशी सांगड घातली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने पहिला एकदिवसीय वर्ल्डकप 1983 ला कपिल देवच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. त्यानंतर 6 वर्ल्डकप हाती निराशा आली. 1987, 1992, 1996, 1999, 2003 आणि 2007 साली भारताला विश्वचषक जिंकता आला नाही. 2003 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र ऑस्ट्रेलियाने पराभूत केल्यानं स्वप्न भंगलं. त्यानंतर 2011 मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने विश्वचषकावर नाव कोरलं. 1983 नंतर 7 सिझननंतर भारताने वर्ल्डकप जिंकला होता. 


Asia Cup 2022 Womens: अंतिम फेरीत भारत 'या' संघाशी भिडणार, पाकिस्तानचा 'मौका' शेवटच्या चेंडूवर हुकला


दुसरीकडे धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने 2007 मध्ये टी 20 वर्ल्डकप जिंकला होता. आता 2009, 2010, 2012, 2014, 2016, 2021 असे 6 सिझन झाले आहेत. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ वर्ल्डकप खेळणार आहे. टी 20 वर्ल्डकपचा आठवा सिझन असला तरी टीम इंडियासाठी पहिल्या विजयानंतर 7 चा योग जुळून आला आहे. त्यामुळे टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकण्याचा योग जुळून आला आहे. 


भारतीय संघाला दोन सराव सामने खेळायचे आहेत. दोन सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध 17 आणि 19 ऑक्टोबरला होणार आहेत.2007 मध्ये भारतीय संघाने T20 विश्वचषक जिंकला तेव्हाही भारतीय संघ फक्त दोन सराव सामने खेळला होता. योगायोग म्हणजे त्यावेळी देखील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ होते. 2007 मध्ये ऑस्ट्रेलिया एकदिवसीय विश्वचषकाचा गतविजेता होता. यावेळी तो T20 विश्वचषकाचा गतविजेता आहे.