मुंबई : 19 वर्षाखालील विश्वविजेत्या भारतीय संघाचं मायदेशात आगमन झालं. मुंबई विमानतळावर हा संघ दाखल झाला. यावेळी या विश्वविजेत्या संघाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणा-या या संघानं अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला होता. या विजयासह भारतानं चौथ्यांदा 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकण्याची किमया साधली.





त्याचप्रमाणे द वॉल अर्थातच राहुल द्रविडचं या संघाला मोलाचं मार्दर्शन मिळालं होतं. पत्रकार परिषदेत पृथ्वी शॉ आणि संघाचे प्रशिक्षक राहुल द्रवीड यांनी संवाद साधला.