लॉस ऐंजेलिस : टेनिसमध्ये जगात अव्वल क्रमांकावर असलेल्या रॉजर फेडररने केवळ ५८ मिनिंटांत आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत इंडियन वेल्स टेनिस टूर्नामेंटमध्ये थेट प्री-क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.


अवघ्या ५५ मिनिटात मिळवला विजय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वित्झर्लंडचा सुप्रसिद्ध टेनिसपटू असलेल्या फेडररने सर्बियाच्या फिलिप कार्जिनोविकचा पराभव केला. प्राप्त माहितीनुसार रॉजरने पुरूष एकेरी प्रकारात पाच वेळा ही कामगिरी केली आहे. मंगळवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात फेडररने केवळ एक तासापेक्षाही कमी वेळात ६-२, ६-१च्या फरकाने कार्जिनोविकला पराभूत करत विजय मिळवला.


प्री-कॉर्टर फायनल सामना फ्रान्सच्या जॅरेमी चाडीसोबत


फेडररने या स्पर्धेतील पुढील प्री-कॉर्टर फायनल सामना फ्रान्सच्या जॅरेमी चाडीसोबत होणार आहे. जॅरेमीने त्याच्या देशाच्या आदरियान मन्नारिनोला ७-५, ४-६, ६-१ अशा फरकाने पराभूत केले.