मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचे अनेक खेळाडू हे त्यांच्या स्टाईल आणि लूकसाठी प्रसिद्ध आहेत. पण भारतीय महिला टीममधील महिला क्रिकेटर या देखील कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीत. सध्या भारतीय क्रिकेट टीमचे फॅन्स भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (ICC World Test Championship Final) सामना पाहण्यात दंग आहेत. पण असं असलं तरी भारतीय महिला क्रिकेट टीमची एक खेळाडू सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय महिला क्रिकेट टीम (India Women's Cricket Team) ब्रिस्टल (Bristol) मध्ये इंग्लंड विरुद्ध क्रिकेट सामने खेळत आहे. सामना ड्रा झाला आहे. पण अनेक महिला खेळाडूंनी डेब्यु केलं आहे. भारतीय टीमची ओपनर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) तिच्या लूकसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.



स्मृती मंधाना (Smriti Mandhana) ने या टेस्ट सामन्यात 78 आणि 8 रन केले. या सामन्या दरम्यान तिचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या लूकची जोरदार चर्चा आहे. बॉलिवूड अभिनेत्री पेक्षा ही ती कमी नसल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.