मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक टूर्नामेंटमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या भारतीय क्रिकेट टीम बुधवारी सकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाली. दरम्यान फॅन्सने खेळाडूंचे जोरदार स्वागत केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एअरपोर्टवर फॅन्सने भारतीय महिला क्रिकेट संघाचं स्वागत करतांना इंडिया- इंडियाचे नारे देखील दिले. अनेक फॅन्सच्या हातात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पोस्टर देखील होते.


विमानतळावर खेळाडूंच्या कपाळावर टिळक लावून स्वागत करण्यात आलं. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या महिला खेळाडूंचं सगळ्यांनी अभिनंदन देखील केलं.


हरमनप्रीत कौर, झुलन गोस्वामी, सुषमा वर्मा, स्मृती मंथाना, शिखा पांडे, पूनम राऊत आणि दिप्ती शर्मा हे खेळाडू मुंबईत दाखल झाले. यांच्या व्यतिरिक्त इतर खेळाडू बुधवार दुपारीपर्यंत भारतात पोहोचतील.