मुंबई : Cricket News : भारताचा अष्टपैलू खेळाडू श्रेयस गोपाल  (Shreyas Gopal) लवकरच त्याची मैत्रीण निकिता शिव  (Nikitha Shiv)  हिच्याशी लग्न करणार आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. 11 ऑगस्टच्या संध्याकाळी, गोपालने अतिशय हटके पद्धतीने आपली लेडी लव्हसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला आणि तिनेही त्याला 'हो' असे उत्तर दिले.


श्रेयस गोपाल यांचा झाल साखरपुडा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयस गोपाल (Shreyas Gopal) याने ट्विटरवर त्याची गर्लफ्रेंड निकिता शिव  (Nikitha Shiv) हिच्यासोबत साखरपुड्या फोटो पोस्ट केला आहे. गोपालने लिहिले, 'तुझ्याशिवाय गेली काही वर्षे अशीच राहिली नसती. मी तुमच्यासोबत पुढचे पाऊल टाकण्यासाठी खूप उत्सुक आहे. मी 11.08.2021 सोबत आयुष्य घालवण्यास उत्सुक आहे '



राजस्थान संघाने केले अभिनंदन 


श्रेयस गोपाल याचे आयपीएल टीम राजस्थान रॉयल्सनेही त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. फ्रँचायझीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले, 'तिने होय असे म्हटले आहे, श्रेयस गोपाल आणि निकिता यांचे अभिनंदन, रॉयल फॅमिली'



स्टायलिश लूकमध्ये निकिता


श्रेयस गोपाल याची गर्लफ्रेंड निकिता शिव हिने किरमिजी रंगाचा जंपसूट तसेच फ्लोरल स्कार्फ घातला होता. लुकबद्दल बोलताना निकिताने अगदी साधा मेकअप केला होता. फक्त पोशाखाला पूरक तिने लाल लिपशेड लावले होते. तसेच केस सुटे ठेवले होते. या साध्या लूकमध्ये ती अधिक उठून दिसत होती.