मुंबई : आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 ओमान आणि यूएईच्या भूमीवर आयोजित केला जात आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी आहे, परंतु भारतीय संघाच्या जवळजवळ सर्व सामन्यांची तिकिटे विकली गेली आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला भारतात राहून स्टेडियम प्रमाणे एन्जॉय करायचे असेल तर ते आता शक्य होणार आहे, कारण आता थिएटरमध्ये बसून तुम्ही मोठ्या पडद्यावर मॅचचा आनंद घेऊ शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर सिनेमांनी भारतीय चाहत्यांना ही मोठी बातमी दिली आहे. शुक्रवारी, पीव्हीआर सिनेमांनी पुष्टी केली की त्याला आयसीसी पुरुषांच्या टी-20 विश्वचषक 2021 च्या क्रिकेट सामन्यांचे थेट प्रदर्शन करण्याचे अधिकार मिळाले आहेत. टी-20 विश्वचषकाचे सामने यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. पीव्हीआरने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, त्याने आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2021 च्या उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसह भारतीय सामन्यांच्या थेट प्रदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (आयसीसी) करार केला आहे.


मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर सिनेमांने सांगितले की, नवी दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबादसह 35 हून अधिक शहरांमधील 75 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये सामने प्रदर्शित केले जातील. पीव्हीआर लिमिटेडचे ​​सीईओ गौतम दत्ता म्हणाले की, आयसीसीशी जोडल्या गेल्यामुळे त्यांना अत्यंत आनंद होत आहे, कारण त्यांना विश्वास आहे की देशात क्रिकेट आणि चित्रपट एकमेकांना पूरक आहेत. ते म्हणतात, "मोठ्या पडद्यामुळे आयसीसी पुरुष टी -20 विश्वचषकाचे कव्हरेज वाढवण्याची एक अनोखी संधी मिळते. क्रिकेट आणि चित्रपट एकमेकांना पूरक आहेत, कारण त्यांना भारतामध्ये धर्म मानले जाते.


भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी टी-20 विश्वचषक 2021 च्या मोहिमेला सुरुवात करेल, ज्यामध्ये भारतीय संघ त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी संघ पाकिस्तानशी लढेल आणि हा सामना ब्लॉकबस्टर सामन्यापेक्षा कमी नसेल. टीआरपी आणि दर्शकांसाठी हा एक वेगळा सामना आहे.