Team India announced: न्यूझीलंडचा भारत दौरा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. श्रीलंकाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियासोबत भिडत होणार आहे. अशातच आता बीसीसीआयने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया जाहीर केली आहे. ट्विट करत बीसीसीआयने संघ जाहीर केलाय. (India’s squads for New Zealand tour of India and first two Test matches against Australia announced marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ:


रोहित शर्मा (C), केएल राहुल (VC), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट  कोहली, एस अय्यर, केएस भरत (WK), ईशान किशन (WK), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव


न्यूझीलंड वनडेसाठी भारताचा संघ:


रोहित शर्मा (C), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (WK), हार्दिक पंड्या (VC), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक


आणखी वाचा - IND vs NZ : टी-20 सिरीजसाठी टीमची घोषणा; कर्णधारालाच दाखवला बाहेरचा रस्ता!


NZ T20I साठी भारताचा संघ:


हार्दिक पंड्या (C), सूर्यकुमार यादव (VC), ईशान किशन (WK), आर गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (WK), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझी चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.


न्यूझीलंडचा भारत दौरा (संपूर्ण शेड्यूल):


पहिली वनडे- 18 जानेवारी, हैदराबाद
दूसरी वनडे- 21 जानेवारी, रायपुर
तीसरी वनडे - 24 जानेवारी, इंदूर
पहिली टी20- 27 जानेवारी, रांची
दूसरी टी20- 29 जानेवारी, लखनऊ
तिसरी टी20- 1 फेब्रुवारी, अहमदाबाद



दरम्यान, आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी केएस भरत,शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे. तर टी-ट्वेंटीसाठी जितेश शर्मा आणि पृथ्वी शॉवर विश्वास दाखवण्यात आलाय. मुकेश कुमारला देखील निवडण्यात आलंय. तसेच, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी सामन्यासाठी सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली आहे.