मोहाली : भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३५९ रन्सचे आव्हान दिले आहे. शिखर धवनच्या शतकी आणि रोहित शर्माच्या ९५ रन्सच्या जोरावर भारताने ५० ओव्हरमध्ये ९ विकेटच्या मोबदल्यात ३५८ रन्स केल्या. टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या भारताची दमदार सुरुवात राहिली. सलामीच्या रोहित शर्मा आणि शिखर धवनने भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली. गेल्या काही मॅचपासून अपयशी ठरत असलेल्या या सलामीच्या जोडीने चांगले पुनरागमन केले. या जोडीने पहिल्या विकेटसाठी १९३ रन्सची पार्टनरशीप केली. भारताला पहिला धक्का रोहित शर्माच्या रुपात लागला. रोहितचे शतक अवघ्या ५ रन्सने हुकले. तो ९५ रन्सवर आऊट झाला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित आऊट झाल्यानंतर लोकेश राहुलला वरच्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवले. लोकेश राहुलने धवनला उत्तम साथ दिली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ६१ रन्सची पार्टनरशीप झाली. चांगली खेळी करत असलेला धवन मोठा फटका मारण्याच्या नादात बोल्ड झाला. त्याने तडाखेदार १४३ रन्स केल्या.


धवन आऊट झाल्यानंतर आलेल्या कॅप्टन कोहलीला यावेळी चांगली खेळी करण्यास अपयश आले. कोहली अवघ्या ७ रन्स करुन माघारी परतला. यानंतर ऋषभ पंतने मोठे फटके मारले. मात्र यादरम्यान लोकेश राहुल २६ रन्सवर आऊट झाला. यानंतर नियमित अंतराने भारताचे विकेट पडत गेले. राहुलच्या पाठोपाठ ऋषभ पंत देखील काही वेळाने आऊट झाला. त्याने  २४ बॉलमध्ये ३६ रन्स केल्या. पंत आऊट झाल्यानंतर भारताने स्वस्त्यात विकेट गमावल्या. 
 
ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ५ विकेट पॅट कमिन्सने घेतल्या. तर झाए रिचर्डसनने ३ आणि एडम झॅम्पाने १ विकेट घेतल्या.