नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये भारताचा ३४ रन्सनी पराभव झाला. धोनीला चुकीच्या निर्णयाने आऊट दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. आता त्यातच धोनीच्या संथ खेळीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. धोनीने रोहितला योग्य साथ दिली नाही, तसंच धोनी फार हळू खेळला असल्याचे वक्तव्य भारताचा माजी फास्ट बॉलर अजित आगरकरनं केलं आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी २८९ रनचं आव्हान दिलं होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आव्हानाचा पाठालाग करताना भारताची अपेक्षित सुरुवात झाली नाही. ओपनर शिखर धवन शून्य रनवर आऊट झाल्यानंतर, पाठोपाठ अंबाती रायडूदेखील भोपळा न फोडता आऊट झाला. यानंतर आलेल्या कॅप्टन कोहलीला देखील मोठी इनिंग करता आली नाही. कोहली ३ रनवर आऊट झाला. यामुळे भारताची परिस्थिती ४ रनवर ३ आउट अशी झाली होती. यानंतर आलेल्या धोनीवर मॅचची जबाबदारी आणि दबाव देखील होता. चौथ्या विकेटसाठी शर्मा-धोनी मध्ये १३७ रनची पार्टनरशिप झाली. या पार्टनरशीप मध्ये रोहितनं ७६ बॉलमध्ये ७५ रन होते तर धोनीनं ९६ बॉल खेळून ५१ रन केल्या. 


काय म्हणाला आगरकर?


मॅच संपल्यानंतर 'क्रिकइंफो' सोबत बोलताना अजित आगरकर म्हणाला की, सुरुवातीलाच भारताच्या तीन प्रमुख विकेट गेल्या असताना धोनीने आल्या आल्या सावकाश खेळणे समजू शकतो. पण धोनी सेट झाल्यानंतर त्याला आपल्या खेळीला गती देता आली नाही. धोनी अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे बाद झाला, पण त्याच्या खेळण्यातून आक्रमकपणा जाणवत नव्हता, असं आगरकर म्हणाला.  


चौथ्या विकेटसाठी शर्मा-धोनीमध्ये १३७ धावांच्या पार्टनरशिपमध्ये सर्वाधिक योगदान हे रोहितचे होते. धोनीच्या सावकाश खेळीमुळे सर्व दबाव हा रोहितवर आला होता. यामुळे रोहितवर बाउंड्री मारण्याचा दबाव निर्माण झाल्याचा तर्क आगरकरने लावला


अधिक वाचा : अंपायरच्या या चुकीच्या निर्णयामुळे भारताचा पराभव ?