नागपूर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने ऑलराऊंडर विराट कोहली याचं भरभरून कौतुक केलं आहे. विराट म्हणाला की, ‘मॅन ऑफद सीरिज’ ठरलेला हार्दिक हा ऑस्ट्रेलियाच्या विरूद्धच्या सीरिजमधील सर्वात मोठी उपलब्धी आहे’.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिकने या सीरिजमध्ये २२२ रन्स आणि ६ विकेट घेतल्या आहेत. विराट म्हणाला की, ‘एक कर्णधार म्हणूण टीमची निवड करणे ही माझ्यासाठी नेहमीच डोकेदुखी राहिलेली आहे. कारण इतक्या खेळाडूंमधून मला सर्वश्रेष्ठ ११ खेळाडूंची निवड करायची असते’. हार्दिक सोबतच विराटने भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचंही कौतुक केलं.   


तो म्हणाला की, ‘भुवी आणि बुमराने चांगली बॉलिंग केली आहे. उमेश आणि शमीने सुद्धा संधी मिळाली तेव्हा चांगलं प्रदर्शन केलं. कुलदीप आणि चहल यांनीही चांगली बॉलिंग केली. हा विजय आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे. आमच्यावर खूप दबाव होता. पण तरी आम्ही सकारात्मक खेळ केला’.