हैदराबाद : ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या २३७ रनचे पाठलाग करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरली आहे. भारताची निराशाजनक सुरुवात झाली . भारताचा स्कोअर ४ रन असताना शिखर धवन  शून्यावर आऊट झाला.  यानंतर आलेल्या कॅप्टन विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी भारताचा डाव सावरला. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ७६ रनची पार्टनरशिप झाली. यानंतर विराट कोहली ४४ रनवर खेळत असताना एलबीडबल्यू आऊट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी २३७ रनचे आव्हान दिले आहे. ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हरमध्ये ७ विकेटच्या मोबदल्यात २३६ रन केले. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ५० रन उस्मान ख्वाजाने केल्या. त्याखालोखाल मार्कस स्टोनिसने ३७ तर एलेक्स कॅरीने नॉटआऊट ३६ रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक ५० रन केल्या.


ऑस्ट्रेलियाची सुरुवात फार खराब झाली. ऑस्ट्रेलियाची पहिला विकेट शून्यावर गेली. ऑस्ट्रेलियाला पहिला झटका जसुप्रीत बुमराहने दिला. बुमराहने कॅप्टन एरॉन फिंचला ० वर आऊट केले. त्यानंतर मार्कस स्टोनिस आणि उस्मान ख्वाजा या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ८७ रनची पार्टनरशिप झाली. ही पार्टनरशिप मोडण्यास केदार जाधवला यश आले. केदारने मार्कस स्टोनिसला ३७ रनवर धोनीच्या हाती स्टंपिग केले. यानंतर ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियाला इंडियन बॉर्लर्सने झटके दिले. 


भारताकडून सर्वाधिक मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव या तिघांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर केदार जाधवने एक विकेट घेऊन चांगली साथ दिली.


 टी-२० सीरिज २-० च्या फरकाने गमवाल्यानंतर आजपासून (२ मार्च )   ५ मॅचच्या वनडे सीरिजला सुरुवात झाली आहे. सीरिजमधील पहिली मॅच हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियम मध्ये खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वनडे सीरिज वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. त्यामुळे या सीरिजमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न असेल.


भारतीय टीम दोन स्पीनर सोबत खेळायला उतरली आहे. यात रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे. इंडियाचा ओपनर रोहित शर्माला या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमध्ये ८ हजार रनचा टप्पा गाठण्याची संधी आहे. त्याला ८ हजार रन पूर्ण करण्यासाठी अवघ्या १९२ रनची गरज आहे.


ताज्या स्कोअर कार्डसाठी क्लिक करा : 


भारताला चौथा धक्का, अंबाती रायुडू १३ रन करुन तंबूत


भारताला तिसरा झटका , रोहित शर्मा ३७ रन करुन माघारी    


भारताला दुसरा झटका , विराट कोहली ४४ रनवर आऊट   


भारताला पहिला झटका , शिखर धवन शून्यावर आऊट


 


भारतीय टीम : विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडु, महेंद्र सिंह धोनी, केदार जाधव, विजय शंकर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोह्म्मद शमी, जसप्रीत बुमराह.


ऑस्ट्रेलिया टीम : एरॉन फिंच (कॅप्टन), जेसन बेहरनडॉर्फ, एलेक्स कॅरी, नॅथन कूल्टर नाईल, पॅट कमिन्स, पीटर हँड्सकॉम्ब, उस्मान ख्वाजा, ग्लेन मॅक्सवेल,  मार्क्स स्टोईनिस , एश्टन टर्नर, एडम जम्पा.