हॅमील्टन :​ भारतीय पुरुष आणि महिला संघ हे एकाच वेळी न्यूझीलंड दौऱ्यावर होते. हा दौरा संपल्यानंतर आता दोन्ही टीमच्याबाबतीत विचित्र साम्य समोर आलं आहे. या दौऱ्याची सुरुवात पुरुष आणि महिला संघांनी मालिका विजयानी केली. भारतीय पुरुष संघानी ४-१ च्या फरकाने एकदिवसीय मालिका खिशात घातली. तर भारतीय महिला संघानी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेत २-१ च्या फरकाने विजय मिळवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय पुरुष आणि महिलांना मालिका पराभव स्वीकारावा लागला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय पुरुष संघाचा १-२ ने तर महिला संघाचा ०-३ च्या फरकाने पराभव झाला. या पराभवात एक विचित्र योगायोग पाहायला मिळाला.


१६ धावांचे विचित्र साम्य 


रविवारी (१० फेब्रुवारी) भारतीय पुरुष आणि महिला संघानं न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय पुरुष आणि महिला संघाला दुसऱ्या डावात फलंदाजी करायची होती. यावेळी दोन्ही संघांचा निसटता पराभव झाला. भारतीय महिला संघाचा तिसऱ्या आणि मालिकेतील अखेरच्या सामन्यात २ धावांनी पराभव झाला. न्यूझीलंडच्या महिला संघानी भारताला विजयासाठी १६२ धावांचे आव्हान दिले होते. विजयी धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाने ४ बाद १५९ धावा केल्या.


तर दुसऱ्या ठिकाणी पुरुष संघाबाबतीत काही वेगळी परिस्थितीत नव्हती. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी २१३ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचे पाठलाग करताना धवन आणि धोनीचा अपवाद वगळता प्रत्येक फलंदाजाने चांगली खेळी केली. पण तरीदेखील भारताचा अवघ्या ४ धावांनी पराभव झाला. एक वेगळी बाब म्हणजे भारतीय पुरुष आणि महिला संघाला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी १६ धावांची गरज होती. पण हा आकडा ना पुरुषांना गाठता आला ना महिलांना. भारतीय पुरुषांनी अखेरच्या ओव्हरमध्ये ११ तर महिला संघाला १३ धावाच करता आल्या. त्यामुळे पुरुष आणि महिलांना १६ चा आकडा भारी पडला.