IND vs NZ 3rd ODI  : भारत आणि न्यूझीलंडमधील तिसरा सामनाही पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे भारताला वनडे मालिका (India Tour Of New Zealand 2022) गमवावी लागली आहे. भारताचा पहिल्या सामन्यात पराभव झाला होता. (ind vs nz 3rd odi has been stopped due to rain match canceled) त्यानंतरचे दोन्ही सामने पावसामुळे रद्द झाले. आजच्या सामन्यात भारताने 220 धावांचं लक्ष्य दिलं होतं. न्यूझीलंडनेही मजबूत सुरूवात केली होती. मात्र पाऊस आला 12 वाजून 57 मिनिटांपासून थांबवण्यात आला,  शेवटी सामना रद्द करण्यात आला. या मालिकेमध्ये न्यूझीलंडच्या टॉम लेथमला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं आहे.  (team india Series loss against New Zealand due to rain)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडची जोरदार सुरुवात झाली. न्यूझीलंडने सलामीसाठी 97 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडला फिन एलेनच्या रुपात पहिला धक्का बसला. उमरान मलिकने एलेनला सूर्यकुमार यादवच्या हाती 57 धावांवर कॅच आऊट केलं. त्यानंतर कॅप्टन केन विलियमसन मैदानात आला. या  दरम्यान दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 7 धावा जोडल्या. अशाप्रकारे न्यूझीलंडची धावसंख्या 18 ओव्हरमध्ये 104 वर पोहचली. मात्र पावसाची बॅटिंग चालू केली आणि अखेर सामना रद्द करण्यात आलाय.



युवा वॉशिंग्टन सुंदरने आजही त्याचा छाम उमटवली, इतर फलंदाज अपयशी ठरत होते. भारत 200 चाही टप्पा पार करेल असं वाटत नव्हतं. वॉशिंग्टनने 51 धावांची खेळी केली करत भारताचा डाव  सांभाळला. तो बाद झाल्यावर भारताच्या इतर फलंदाजांना लवकर तंबूत पाठवलं.