सेंच्युरिअन : भारतीय महिला क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेविरोधात होणारी चौथी टी-२० मॅच जिंकल्यास नवा रेकॉर्ड आपल्या नावावर होण्याची शक्यता आहे.


आघाडी कायम ठेवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चौथी टी-२० मॅच बुधवारी होणार आहे. पाच मॅचेसच्या सीरिजमध्ये विजय मिळवत आघाडी कायम ठेवण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरणार आहे.


महिला टीम इंडियाची विजयी घोडदौड


पहिल्या दोन टी-२० मॅचमध्ये भारतीय टीमने सात आणि नऊ विकेट्सने विजय मिळवला होता. तर, तिसऱ्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टीमने विजय मिळवला. यापूर्वी वन-डे सीरिजमध्ये भारताने २-१ने विजय मिळवला आहे. 


चौथी टी-२० मॅच भारतीय टीमने जिंकल्यास एका दौऱ्यात दोन सीरिज जिंकणारी पहिली महिला टीम बनणार आहे.


पराभवाचा सामना करावा लागला


हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय टीमला विजय मिळवणं तितकसं सोप नाहीये. तिसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाचा मध्यक्रम फलंदाजीचा बुरुज ढासळला त्यामुळे टीम इंडिया १७.५ ओव्हर्समध्ये १३३ रन्सवर ऑल आऊट झाली. तर, १२व्या ओव्हरमध्ये भारतीय टीमचा स्कोअर ९३ रन्सवर २ विकेट्स होता.


कॅप्टन हरमनप्रीतने ३० बॉल्समध्ये ४८ रन्स केले आणि स्मृती मंदानाने ३७ रन्स करत दुसऱ्या विकेटसाठी ५५ रन्सची पार्टनरशीप केली. मात्र, यानंतर भारतीय टीमला चांगला स्कोअर करता आला नाही.



गेल्या मॅचमध्ये विजय मिळाल्यामुळे आफ्रिकन टीमचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. शबनीम इस्माईलने गेल्यामॅचमध्ये ३० रन्स देत पाच विकेट्स घेतले होते.


महिला टीमची चौथी टी-२० मॅच भारतीय वेळेनुसार, सायंकाळी चार वाजून ३० मिनिटांनी सुरु होणार आहे. या मॅचचं थेट प्रक्षेपण सोनी टेन १ वर आणि टेन ३ वर पहायला मिळणार आहे.