नवी दिल्ली : दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा सूर हरवल्याचे चित्र टेस्ट मॅचच्या दोन्ही सामन्यात पहायला मिळाले. एकूण तीन सामन्यांची असलेल्या मालिकेत अनुक्रमे ७२ आणि १३५ धावांनी भारताला पराभवाचा सामना करावाल लागला. त्यामुळे भारताने ही मालिका तर, गमावलीच आहे. तसेच, दक्षिण अफ्रिकेचे पारडेही २-०असे जड आहे. अशा स्थितीत भारताला आपली उरलीसुरली पथ जर वाचवायची असेल तर, काही करून तिसरा सामना तरी, जिंकावाच लागेल. त्यासाठी भारताला तारणहाराची गरज भासत आहे. ही गरज रोहित शर्मा भरून काढेल अशी आशा आहे.


उपकर्णधार अजिंक्य रहाणेला काहीसे रोहितवर विश्वास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरूद्ध खेळलेल्या मालिकेवेळी एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये सर्वाधीक वेगवान शतक ठोकण्याचा भारतीय विक्रम करणारा रोहित शर्मा सध्या चमकदार कामगिरी करताना दिसतो आहे. कदाचित म्हणूनच उपकर्णधार अजिंक्य रहाणेला काहीसे डावलून रोहितवर विश्वास दाखवण्यात आला आहे. त्याची निवड टेस्ट संघात करण्यात आली आहे.


रोहिताच सूर अबोलच तरीही....


रोहितने पहिल्या टेस्टच्या पहिल्या डावात ११ धावा केल्या. दुसऱ्या डावात त्याने १० धावा केल्या. दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावातही त्याने १० धावा केल्या. वेगवान गोलंदाच कागिसो रबाडाने त्याला दुसऱ्यांदा बाद केले. दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या डावात त्याने ४७ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीचा विचार करता रोहिताच सूर या टेस्टमध्ये तरी काहीसा अबोलच राहिला आहे. पण, सध्यास्थितीत तरी पुन्हा एकदा त्याच्यावरच भिस्त असल्याची चर्चा आहे.



रोहितकडून चमकदार कामगिरीचा कयास


दरम्यान, क्रिकेटमधल्या जाणकारांना तिसऱ्या टेस्टमध्ये रोहित चमकदार कामगिरी करेल असा कयास आहे. रोहिनते नेट प्रॅक्टीसमध्ये म्हटले आहे की, आपले फटकार आता शांत बसरणार नाही. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकांऊंटवरून रोहितच्या नेट प्रॅक्टीसचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत रोहित शर्मा नेट प्रॅक्टीस करताना दिसत आहे. यात तो एक शानदार फटका लगावतानाही दिसतो आहे. हा फटका इतका सुंदर आहे की, चेंडू मैदानाबाहेर पोहोचला आहे. या फटक्यावरूनच अनेकांनी म्हटले आहे की, रोहिटला सूर गवसला आहे.