केपटाऊन : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅचच्या पहिल्याच दिवशी १३ विकेट्स गेल्या आहेत. टीम इंडियाच्या बॉलर्सने जबरदस्त प्रदर्शन दाखवत आफ्रिकेला दणका दिला. आफ्रिकेची संपूर्ण टीम २८६ रन्सवर ऑल आऊट झाली.


मॅचच्या सुरुवातीला आफ्रिकन टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या टीमला मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं. आफ्रिकन टीमला भारतीय बॉलर्सने २८६ रन्सवर ऑल आऊट केलं.


टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक म्हणजेच ४ विकेट्स घेतले. आर अश्विनने २ विकेट्स आणि मोहम्मद शमी, बुमराह, हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतले.


दक्षिण आफ्रिकेच्या टीमकडून एबी डेविलियर्सने ६५ रन्स, प्लेसिसने ६२ रन्स आणि क्यु डी कॉकने ४३ रन्स केले. या तिघांव्यतिरिक्त इतर बॅट्समनला मोठा स्कोर उभारण्यात अपयश आलं.


यानंतर मैदानात आलेल्या टीम इंडियालाही दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सने झटका दिला. मुरली विजय अवघ्या १ रनवर आऊट झाला, शिखर धवन १६ रन्सवर आणि विराट कोहली ५ रन्सवर आऊट झाला. दिवस अखेरीस टीम इंडिया २८ रन्सवर तीन विकेट्स गमावले आहेत.