केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात विराट सेनेपूर्वी महिला टीम इंडियाने एक नवा इतिहास रचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटच्या इतिहासात महिला टीम इंडियाने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. आफ्रिकेच्या एका दौऱ्यात दोन सीरिज आपल्या नावावर महिला क्रिकेट टीमने केल्या आहेत. अशा प्रकारे आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत करणारी महिलांची पहिलीच टीम ठरली आहे.


३ मॅचेसच्या वन-डे सीरिजमध्ये आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर पाच मॅचेसच्या टी-२० सीरिजमध्येही ३-१ ने पराभव केला आहे. 


पहिल्यांदा बॅटिंग करताना महिला टीम इंडियाने ४ विकेट्स गमावत १६६ रन्स केले. यामध्ये कॅप्टन मिताली राजने ६२ रन्सची इनिंग खेळली. त्यानंतर मैदानात उतरेली आफ्रिकन महिलांची टीम ११२ रन्सपर्यंतच मजल मारु शकली. अशा प्रकारे एकाच दौऱ्यात दोन सीरिज जिंकणारी टीम इंडिया पहिली टीम ठरली आहे.


भारतीय टीमकडून शिखा पांडे, रुमेली धर आणि राजेश्वर गायकवाड यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतले. भारतीय टीमकडून मिताली राजने ५० बॉल्समध्ये ६२ रन्स केले. मंधाना लवकरच आऊट झाली. जेमिमा रॉड्रिग्जने ४४ रन्सची इनिंग खेळली. 


वन-डे टीम इंडियाची कमान सांभाळणाऱ्या मिताली राजने खेळलेल्या चांगल्या खेळीमुळे तिला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आलं. ५ मॅचेसच्या सीरिजमध्ये मिताली केवळ एका मॅचमध्ये शून्यावर आऊट झाली तर इतर मॅचेसमध्ये हाफ सेंच्युरी लगावली.