नागपूर : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी लंचपर्यंत श्रीलंकन टीमने दुसऱ्या इनिंगमध्ये ८ विकेट्स गमावत १४५ रन्स केले आहेत. चंडीमल ५३ रन्सवर आणि लकमन १९ रन्सवर खेळत आहेत.


निम्म्याहून अधिक टीम तंबूत परतली


मॅचच्या चौथ्याच दिवशी श्रीलंकन टीमच्या दुसऱ्या इनिंगमध्ये निम्म्याहून अधिक टीम तंबूत परतली आहे. आठ विकेट्स आऊट झाल्याने आता टीम इंडियाला विजय मिळविण्यासाठी केवळ दोन विकेट्सची आवश्यकता आहे.


श्रीलंकेला करावा लागणार मोठा स्कोर


श्रीलंकेला या मॅचमध्ये होणारा पराभव टाळायचा असेल तर २६० रन्स करावे तर लागतीलच पण त्यासोबतच टीम इंडियासमोर रन्सचा डोंगर उभा करावा लागणार आहे. मात्र, आठ विकेट्स गेल्याने हे आता शक्य नाहीये.


टीम इंडियाने उभा केला मोठा स्कोर


श्रीलंकन टीमने पहिल्या इनिंगमध्ये २०५ रन्स केले होते. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये सहा विकेट्स गमावत ६१० रन्स करत आपली इनिंग घोषित केली. टीम इंडियाच्या चार बॅट्समनने मॅचमध्ये सेंच्युरी लगावली. यामध्ये विराट कोहलीने डबल सेंच्युरी केली. त्यामुळे टीम इंडियाने श्रीलंकेवर ४०५ रन्सने आघाडी घेतली.


यांनी घेतले विकेट्स 


टीम इंडियाकडून आर अश्विनने तीन विकेट्स घेतले. रवींद्र जाडेजा, ईशांत शर्मानं दोन विकेट्स तर, उमेश यादवने एक विकेट घेतला.