नागपूर : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने जबरदस्त इनिंग खेळत सेंच्युरी लगावली आहे.


टेस्ट क्रिकेटमधील १९वी सेंच्युरी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर टेस्ट मॅचमध्ये विराट कोहलीने आपल्या टेस्ट क्रिकेटमधील १९वी सेंच्युरी झळकावली आहे. ही सेंच्युरी आणखीन एका कारणामुळे खास ठरली आहे. कारण, या सेंच्युरीसोबतच विराटने असा एक कारनामा केला आहे जो आजपर्यंत कुठलाही भारतीय कॅप्टन करु शकलेला नाहीये.


श्रीलंकन क्रिकेटर्सला चांगलाच फोडला घाम 


विराट कोहलीने धडाकेबाज बॅटिंग करत श्रीलंकन क्रिकेटर्सला चांगलाच घाम फोडला. आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील ५१वी सेंच्युरी लगावली. विराटने १३० बॉल्समध्ये १० फोर लगावत सेंच्युरी केली. 


आजपर्यंत कुठल्याही भारतीय कॅप्टनला जमलेलं नाही


नागपुरमध्ये श्रीलंकन टीम विरोधात सेंच्युरी झळकावत विराट कोहली एक रेकॉर्ड तोडला आहे. विराटने असं एक काम केलं आहे जे आजपर्यंत कुठल्याही भारतीय कॅप्टनला जमलेलं नाहीये. कॅप्टन म्हणून विराटची ही १२वं टेस्ट सेंच्युरी आहे आणि ही सेंच्युरी लगावत त्याने भाराताचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांचाही रेकॉर्ड तोडला आहे.


सुनील गावस्करांचा रेकॉर्ड मोडला


कॅप्टन म्हणून सर्वाधिक ११ सेंच्युरी सुनील गावस्कर यांच्या नावावर होत्या. गावस्करांच्या या रेकॉर्डची बरोबरी विराटने कोलकाता टेस्ट मॅचमध्ये केली होती. मात्र, आता नागपूर टेस्ट मॅचमध्ये पुन्हा एक सेंच्युरी लगावत विराटने गावस्करांनाही मागे टाकलं आहे. या लिस्टमध्ये विराट, गावस्कर यांच्यानंतर नाव आहे ते म्हणजे मोहम्मद अझहरुद्दीन यांचं. अझहरुद्दीन यांनी कॅप्टन असताना ९ टेस्ट सेंच्युरी केल्या आहेत. 


विराटने पॉटिंगलाही टाकलं मागे


२०१७ या वर्षात विराट कोहलीची ही १०वी टेस्ट सेंच्युरी आहे आणि या सेंच्युरीसोबतच एका वर्षात सर्वाधिक सेंच्युरी लगावण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉंटिंग याच्या नावावर होता.


पाँटिंगने एका वर्षात ९ सेंच्युरी लगावल्या होत्या. तसेच त्याने आपल्या करिअरमध्ये हा रेकॉर्ड दोनवेळा केला होता. पहिला रेकॉर्ड २००५ साली आणि त्यानंतर २००६ साली ९ सेंच्युरी लगावल्या होत्या.