मुंबई : श्रीलंकेविरोधातील टी-२० मॅचेसच्या सीरिजमधील शेवटच्या मॅचमध्ये दोन बदल करण्यात आले. टीममधील युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह या दोघांना विश्रांती देण्यात आली.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


टीममध्ये करण्यात आले दोन बदल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युजवेंद्र चहलला विश्रांती देण्यात आली आहे. चहलऐवजी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर जसप्रीत बुमराहऐवजी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे.


या टी-२० मॅचमध्ये एन्ट्री मिळताच वॉशिंग्टन सुंदर हा भारताकडून टी-२० मॅच खेळणारा सर्वात तरुण प्लेअर ठरला आहे. वॉशिंग्टन सुंदर याने १८ वर्ष आणि ८० दिवसातच टी-२० क्रिकेटमध्ये डेब्यू केलं.


तोडला ऋषभ पंतचा रेकॉर्ड 


यासोबतच वॉशिंग्टन सुंदर याने ऋषभ पंत याचा रेकॉर्ड तोडला आहे. ऋषभ पंत याने १९ वर्ष आणि १२० दिवसांचा असताना टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.



जगातील ११ वा प्लेअर


वॉशिंग्टन टी-२० क्रिकेट खेळणारा भारताचा ७२ वा प्लेअर ठरला आहे. टी-२० क्रिकेटविश्वातील सर्वात तरुण प्लेअर्सपैकी तो ११व्या स्थानावर आहे. हाँगकॉन्गचा वकास खान हा सर्वात तरुण प्लेअर आहे. त्याने १५ वर्ष २५९ दिवसांचा असताना डेब्यू केलं होतं.