मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या उरलेल्या ३ मॅचसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. फास्ट बॉलर मोहम्मद शमीला टीम बाहेर जावं लागलं आहे. तर जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. बीसीसीआयनं ट्विटरवर टीमची घोषणा केली. पहिल्या २ वनडेसाठी १४ सदस्यांच्या टीमची घोषणा केली होती. पण उरलेल्या ३ मॅचसाठी १५ सदस्यांच्या टीमची निवड करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद शमीचा पहिल्या दोन्ही मॅचमध्ये ११ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला होता. तर बुमराह आणि भुवनेश्वरला पहिल्या २ मॅचसाठी आराम देण्यात आला होता. तर खलील अहमदला टीममध्ये कायम ठेवण्यात आलंय. तिसरी वनडे २७ ऑक्टोबरला पुण्यात, चौथी वनडे २९ ऑक्टोबरला मुंबईत आणि पाचवी वनडे १ नोव्हेंबरला तिरुअनंतपुरमला खेळवण्यात येईल.



पहिल्या २ वनडेमध्ये फास्ट बॉलर अपयशी


पहिल्या २ वनडेमध्ये भारतीय फास्ट बॉलर अपयशी ठरले. पहिल्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजनं भारताला ३२३ रनचं आव्हान दिलं होतं. तर दुसऱ्या वनडेमध्ये ३२२ रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं ३२१ रन करत मॅच टाय केली. ५ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये भारत १-०नं आघाडीवर आहे.


भारतीय टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, ऋषभ पंत, एमएस धोनी (विकेट कीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, केएल राहुल, मनिष पांडे