INDW vs PAKW: महिला टी-20 वर्ल्डकपला (Women’s T20 World Cup 2023) सुरु झाली आहे. आज टीम इंडियाच्या महिला पहिला सामना पाकिस्तानशी (INDW vs PAKW) खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या या हायव्हेल्टेज सामन्यात महिला खेळाडूंमध्ये राडा पहायला मिळाला. भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या एका खेळाडूने आऊट झाल्यानंतर अपशब्द वापरल्याचं कॅमेरात कैद झालं आहे.


विकेट गमावल्यानंतर संतापली Javeria Khan


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला टी-20 वर्ल्डकप 2023 मध्ये भारताची लढत पाकिस्तानशी होतेय. या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार बिस्माह माहरूफ़ ने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात पाकिस्तानी ओपनर झवेरिया खान उतरली होती. टीमचा स्कोर अवघा 10  रन्स असताना झवेरियाची विकेट गेली. 


दिप्ती शर्माच्या ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवर स्वीप शॉट खेळण्याच्या नादात झवेरियाची विकेट गेली. भारताची कर्णधार हरमनप्रीतने तिचा उत्तम कॅच घेतला. यावेळी पव्हेलियनमध्ये जाताना झवेरिया आपल्याच साथी खेळाडूला दम दिल्याचं दिसून आलं. यावेळी तिने 3 नंबरवर फलंदाजी करण्यासाठी येणाऱ्या खेळाडूशी बोलताना अपशब्द वापरल्याचं व्हिडीओत कैद झालं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.



IND W vs PAK W: टीम इंडियाची प्लेइंग 11


शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ति शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड़, रेणुका ठाकुर सिंह


IND W vs PAK W: पाकिस्तानची प्लेइंग 11


झवेरिया खान, मुनिबा अली (विकेटकीपर), बिस्माह मारूफ (कर्णधार), निंदा डार, सिदरा अमीन, आलिया रियाज, आयशा नसीम, ​​फातिमा सना, अमीन अनवर, नशर संधू, सलीह इकबा