Arjun Tendulkar : वानखेडेच्या मैदानावर आज इंडियन प्रीमियर लीगच्या 16 (IPL 2023) व्या सिझनचा 22 वा सामना खेळवण्यात आला. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata knight riders) यांच्यामध्ये हा सामना रंगला होता. हा सामना मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी फार महत्त्वाचा होता, कारण सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आजच्या या सामन्यात डेब्यू केला आहे. गेल्या 3 वर्षांपासून तो डेब्यूच्या प्रतिक्षेत होता.


12 बॉल्सची डेब्यू मॅच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोलंदाज अर्जुन तेंडुलकरसाठी आजचा दिवस खूप खास होता. सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये अर्जुन तेंडुलकरने डेब्यू केला. दरम्यान आजच्या सामन्यात मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवने सांभाळली होती. मात्र यावेळी कुठेतही अर्जुनवर अन्याय झाल्याचं दिसून आलं. डेब्यूच्या सामन्यात अर्जुनला केवळ 2 ओव्हर फेकण्याची संधी मिळाली.


मुंबई इंडियन्स गोलंदाजीसाठी उतरताच पहिली ओव्हर अर्जुनने केली. या ओव्हरमध्ये अर्जुनने केवळ 5 रन्स दिले. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने 12 रन्स खर्च केले. यावेळी 8.50 च्या इकोनॉमीने त्याने रन्स दिले. मात्र या 2 ओव्हर्सनंतर कर्णधार सुर्यकुमार यादवने त्याला ओव्हर दिली नाही. दरम्यान याबाबत चाहच्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. 


सूर्याने अर्जुनला नाही दिली ओव्हर


आजच्या सामन्यात अर्जुनसोबत डुआन जेन्सनने देखील डेब्यू केला होता. अर्जुनप्रमाणे जेन्सनही फास्ट गोलंदाजी करतो. जेन्सने आजच्या सामन्यात 13.25 च्या इकोनॉमीने 4 ओव्हर्समध्ये 53 रन्स वाटले. एकंदरीत डुआनची इकोनॉमी अर्जुनपेक्षा जास्त होती. त्यामुळे अशा परिस्थितीत अर्जुनला पुन्हा ओव्हर देणं टीमसाठी फायदेशीर ठरलं असतं. 


अर्जुनला सपोर्ट करण्यासाठी सारा मैदानात


आजच्या सामन्यात सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर देखील मैदानात उपस्थित होती. भाऊ अर्जुन तेंडुलकरला सपोर्ट करण्यासाठी सारा तिच्या मित्रांसोबत सारा स्टेडियममध्ये दिसली. इतकंच नाही तर अर्जुनने गोलंदाजी केल्यानंतर साराची रिएक्शन देखील व्हायरल झाली आहे. 


सचिनने लेकाला दिल्या खास टिप्स


सामना सुरु होण्यापूर्वी सचिन तेंडुलकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सचिन अर्जुनला काही खास टीप्स देताना दिसला होता. अर्जुनने देखील सामन्यापूर्वी वडिलांचा सल्ला घेतला होता.